महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केपे गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कुपनांसाठी झुंबड

06:57 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड प्रतिसाद, मुसळधार पावसाची पर्वा न करता पहाटेपासून लागल्या रांगा

Advertisement

वार्ताहर/ केपे

Advertisement

केपे गणेशोत्सव मंडळाची देणगी कुपने मिळविण्याकरिता गोव्याच्या विविध भागांतून लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून शनिवारी पहाटेपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या. यंदाही देणगी कुपनांना प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.

केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटले की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येथील देणगी कुपने येतात. कारण त्यावरील बक्षिसे ही सदैव आकर्षक राहिलेली आहेत व निकाल पारदर्शक असतो. गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेर आणि इतर देशांमध्ये कामानिमित्त असलेले गोवेकरही सदर देणगी कुपने मिळवण्यास आतूर असतात. यामुळेच अवघ्या काही वर्षांत या गणेशोत्सव मंडळाचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे. कितीही देणगी कुपने उतरविली, तरी अवघ्या काही दिवसांत ती संपतात. याचमुळे सदैव मंडळाची देणगी कुपने मिळवण्याकरिता गर्दी असते.

दरवर्षी लोकांचा वाढता उत्साह व प्रतिसाद पाहून यंदा मंडळाने देणगी कुपनांच्या संख्येत भर घालून दीड लाख कुपने उतरविलेली आहेत व 500 रु. अशी कुपनाची किंमत ठेवली आहे. तसेच आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. कूपन विक्रीच्या शुभारंभाच्या दिवशीच गर्दी होते हे पाहून 1 ऑगस्ट रोजी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला व 3 रोजी सकाळी कूपन विक्रीला सुऊवात करण्याचे ठरविण्यात आले होते.

शनिवारी केपे भागात देणगी कुपने खरेदी करण्यासाठी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि मोठ्या रांगा लागल्या होत्या. गर्दी पाहून जी विक्री सकाळी 8 वा. सुरू करायची होती ती सकाळी 7.15 वाजताच सुरू करावी लागली. मुसळधार पाऊस पडत असतानाही कुपने घेण्याकरिता लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. देणगी कुपनांची विक्री रोख रक्कम स्वीकारूनच केली जात असल्याने केपे भागातील बहुतेक बँक एटीएममधील पैसे संपल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक जणांनी सकाळी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. यंदा क्रीडा संकुलात देणगी कूपन विक्री ठेवल्याने लोकांच्या रांगाच लागल्या नाहीत, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क करून ठेवली गेली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article