For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुपया आणि डॉलर यांच्यात चढाओढ

06:04 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
रुपया आणि डॉलर यांच्यात चढाओढ
Advertisement

सुरुवातीच्या व्यवहारात रुपया पाच पैशांनी घसरुन 82.85 प्रति डॉलरवर

Advertisement

मुंबई :

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन चलन मजबूत झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे बुधवारी रुपया प्रभावीत होत उघडला. विदेशी चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन चलनात सुधारणा झाल्याने रुपया काहीसा घसरणीसह व्यवहार करेल. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया प्रति डॉलर 82.82 वर उघडला. नंतर तो आणखी घसरला आणि प्रति डॉलर 82.85 च्या पातळीवर पोहोचला.

Advertisement

मंगळवारी रुपया पाच पैशांनी घसरला आणि प्रति डॉलर 82.80 वर बंद झाला. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती मोजणारा डॉलर निर्देशांक 0.07 टक्क्यांनी घसरून 102.88 वर आला.

जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.56 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 82.38 डॉलरवर पोहोचले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी 73.12 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

Advertisement
Tags :

.