कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Phaltan Doctor Death Case : डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांची भूमिका ठाम ; आवश्यक असल्यास एसआयटीची स्थापना केली जाईल

05:31 PM Oct 28, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

              महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास वेगात

Advertisement

फलटण : रुग्णालयातील येथील उपजिल्हा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल अथवा छळाबाबतची तक्रार रुग्णालयाच्या अंतर्गत समितीकडे आजतागायत केलेली नव्हती. महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. हा तपास फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालेल. गरज भासली तर आपण एसआयटीची स्थापना करू. या घटनेत लवकरात लवकर न्याय देण्याच्या दृष्टीने आमची पाठपुराव्याची भूमिका राहील, असे स्पष्ट करून लवकरच संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना आपण भेट देणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी चाकणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व पोलीस उपाधीक्षक विशाल खांबे यांच्याशी चर्चा केली व तपासाबाबत माहिती घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार सचिन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शिवरूपराजे खर्डेकर यांची उपस्थिती होती. घटनेमध्ये या पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात व डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात तक्रार आहे. या अनुषंगाने चौकशी समिती नेमली गेली होती. या एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या. एकमेकांच्या विरुद्ध ज्या तक्रारी होत्या, त्यामध्ये पोलिसांची तक्रार अशी होती की फिट आणि अनफिट या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे, त्याला दिरंगाई करणे, उशिरा आलेल्या पेशंटला चेक न करने तर रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात, फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याबाबत दबाव येणे, कामाच्या वेळेतच आरोपी तपासणीसाठी आणले गेले पाहिजेत, अशी डॉक्टरांची तक्रार होती.

यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थितबोलावे, अशा पद्धतीने चौकशी समितीचा अहवाल होता. त्याचबरोबर त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी, असा निर्णयही चौकशी समितीने दिलेला होता. यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणचे उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता.

त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर करून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिली होती, असेही चाकणकर म्हणाल्या. या घटनेच्या तपासात पोलिसांनी सीडीआर काढलले आहेत. या सीडीआरच्या अनुषंगाने त्यांनी सुसाईड नोटमध्ये टमध्ये जी नावे दिली होती, त्यामध्ये गोपाल बदने असेल किंवा प्रशांत बनकर असेल, जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाल बदने यांच्याबरोबर त्यांचा संवाद आहे, त्या नंतर संबंधिताचा त्यांच्याबरोबर कोणताही संवाद नाही. प्रशांत बनकर यांच्याबरोबर त्यांचा संवाद आहे.

ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता. त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी महिला डॉक्टर दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजन करण्यासाठी गेल्या होत्या. फोटो काढण्यावरून व फोटो नीट आले नाहीत, यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या, तेव्हा त्यांचे वडील बनकर यांनी त्यांना समजून सांगितले की सण आहे,

संध्याकाळी या ठिकाणी थांबू नका, अशी समजूत काढून त्यांना परत एकदा घरी आणले. त्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या. रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाइल बंद होता आणि त्या अनुषंगाने हे वाद झालेले आहेत. मी आत्महत्या करेन अशा पद्धतीचा रिप्लाय त्यांनी प्रशांत बनकरला केला आहे. तेव्हा प्रशांत बनकर यांनी में डम आपण यापूर्वी खूप वेळा ही धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये संवाद आहेत. सीडीआरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. फॉरेन्सिक लॅबचा देखील अहवाल येईल.

पोलिसांना आणि त्याचबरोबर वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली आहे की पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज मिळावा जर तो रिपोर्ट आज किंवा उद्यापर्यंत मिळाला तर अनेक गोष्टी आपल्या समोर येतील. परंतु प्राथमिक पोस्टमार्टमध्ये हा रिपोर्ट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या अनुषंगाने आलेला आहे असेही चाकणकर यांनी सांगितले. त्याचबरोबर यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व मृत महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये संवाद किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिलेले आहे की त्यांच्यावर त्याने चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला,

त्यामध्ये त्यांच एकत्रित लोकेशन कुठे आहे का ते डिटेक्ट केलं जाईल, सीडीआरमधून आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून ते लोकेशन सापडल्यानंतर तसेच बदनेकडूनसुद्धा पोलीस याची माहिती घेत आहेत, या अंतर्गत अशा पद्धतीने काही घटना घडली आहे का व इतर बाबीची माहिती तपास प्रक्रियेमध्ये घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#JusticeForDoctor#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#WomensCommissionDoctorSuicidePhaltanPhaltan Doctor Death Case
Next Article