अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर राज्य चालवणे चिंताजनक-सतेज पाटील
satejpatil-शिदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. तर सर्वसामान्यांचे देखील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेऊन मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचे निर्देश दिलेत. त्यावरून आता विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंत्रिमंडळाचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर शिंदे सरकारवर टीका केली आहे.
सतेज पाटील असे म्हणाले कि, अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर राज्य चालवणे चिंताजनक आहे. शिंदे सरकार ४० मंत्री करायचा निर्णय घेऊ शकत नाहीत तर राज्य चालवू शकतील का? असा सवाल पाटील यांनी करत मंत्रिमंडळाची लोकशाहीची व्यवस्था अस्तित्वात न आणणे हे विकासाच्या दृष्टीने घातक असल्याचं पाटील यांनी म्हटले आहे.
देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात काँग्रेस सहभागी होणार असून हर घर झेंडा मोहिमेत काँग्रेस खादी झेंडा घेऊन सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.