धावपटू समी कालीरामनवर दोन वर्षांची बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या 2021 च्या जागतिक अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धेत 4×400 मी मिश्र रिलेचे कांस्यपदक विजेत्या संघाची सदस्य असलेल्या समी कालीरामनवर 2024 मध्ये केलेल्या डोपिंगच्या गुह्यासाठी नाडा अँटी-डोपिंग शिस्तपालन पॅनेलने दोन वर्षांची बंदी घातली आहे.
22 वर्षीय समीला गेल्या वर्षी बंदी घातलेल्या पदार्थ क्लोमिफेनसाठी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने तात्पुरती निलंबनाची शिक्षा दिली होती. नाडा अपडेटनुसार, गेल्या वर्षीच्या 14 ऑक्टोबरपासून तिच्या बंदीचा कालावधी सुरू झाला आहे. तिने 2024 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 53.18 सेकंद आहे. केनियातील नैरोबी येथे झालेल्या 2021 च्या जागतिक अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धेत सुमी, बराथ श्रीधर, प्रिया मोहन आणि कपिल या भारतीय 4×400 मीटर मिश्र रिले चौकडीने 3 मिनिटे 20.60 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले होते.
नाडाच्या इतर ट्रॅक आणि फील्ड खेळाडू लांब पल्ल्याचे धावपटू श्रीराग ए एस आणि रेश्मा दत्ता केवटे यांच्यावर अनुक्रमे पाच आणि चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. वेटलिफ्टर सिमरनजीत कौर (पाच वर्षे), बॉक्सर रोहित चमोली (दोन वर्षे), कुस्तीगीर आरजू (चार वर्षे), कब•ाrपटू मोहित नंदल (चार वर्षे) आणि रेसर अनिरुद्ध अरविंद (तीन वर्षे) यांनाही डोपिंगच्या गुह्यांसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.