मराठा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी पॅनेल
10:42 AM Dec 24, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
पहिल्या सामान्य गटातून सत्ताधारी पॅनेलचे आठजण निवडून आले. महिलावर्गातून 2, मागास ब मधून 1, एससीमधून 1, एसटीमधून 1 असे 15 पैकी 14 उमेदवार सत्ताधारी पॅनेलचे आहेत. प्रत्येक उमेदवारास मिळालेली मते पुढीलप्रमाणे- सामान्य गट- बी. एस. पाटील (315), बाळाराम पाटील (883), बाळासाहेब काकतकर (868), मोहन बेळगुंदकर (733), दिगंबर पवार (921), दिनेश शिरोळकर (150), मोहन चौगुले (783), एल. एस. होनगेकर (655), विक्रमसिंह कदम-पाटील (569), विनायक होनगेकर (648), विनोद हंगिरगेकर (803), विश्वनाथ हंडे (771), शरद पाटील (58), सुनील अष्टेकर (154). महिला गट- दीपाली दळवी (868), रेणू किल्लेकर (1063), रेणुका शिरोळकर (188). मागास ब गट- मोतेश बार्देशकर (79), लक्ष्मण गावडे (225), विश्वजित हसबे (791), अशोक कांबळे (841), सुशीलकुमार खोकाटे (287), एसटी गट- लक्ष्मण नाईक (921), विजय नाईक (167) अशी मते पडली.
Advertisement
विजयी उमेदवारांकडून जल्लोष
Advertisement
बेळगाव : मराठा को-ऑप. बँक, बसवाण गल्लीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी घेण्यात आली. ही निवडणूक ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, चेअरमन दिगंबर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. निवडणुकीत पाच वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका असल्याने मतदारांना मत देण्यास अडचण निर्माण झाली. त्यावेळी 440 मते बाद ठरली.
Advertisement
Advertisement
Next Article