For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायप्रसमध्ये मिळाले प्राचीन मंदिराचे अवशेष

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सायप्रसमध्ये मिळाले प्राचीन मंदिराचे अवशेष
Advertisement

सायप्रस या देशात खोदकामादरम्यान 4 हजार वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. वैज्ञानिकांनी या मंदिराची पाहणी केली असता त्यांना प्राचीन दगड आढळून आले. या मंदिरात एका युवतीला कैद करण्यात आले होते, असा दावा आता करण्यात येत आहे. भूमध्य समुद्रात असलेल्या एका बेटावर वैज्ञानिकांना चकित करणाऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत. सायप्रसमध्ये असलेल्या पुरातत्व स्थळाचे नाव एरिमी आहे. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ सिएनाच्या लुका बॉम्बार्डियरी या प्रकल्पाच्या प्रमुख होतय. प्रोजेक्टला सायप्रसच्या डिपार्टमेंट ऑफ एंटीक्ससोबत मिळून पूर्ण करण्यात आले आहे. अलिकडच्या उत्खननात एक जुने आणि पवित्र मंदिर मिळाले असून याचे धार्मिक आणि वैचारिक स्वरुपात अत्यंत महत्त्व राहिले असावे, असे लुका यांनी म्हटले आहे.

Advertisement

कांस्य युगाच्या मध्य काळात एरिमी हिलवर स्थायिक होण्याचा निर्णय कारागिरांनी घेतला असावा, तसेच तेथे समुदायाच्या वास्तव्याकरता एका ठिकाणाची निर्मिती करण्यात आली असावी. या ठिकाणच्या एका भागात पथकाला एक खोली मिळाली असून तेथे एक रहस्यमय दगड होता, जो सुमारे 7 फूट उंच असून याच्या संरचनेला पॉलिश करण्यात आले होते, असे लुका यांनी सांगितले. मोनोलिथ पूर्वी खोलीच्या मध्ये ठेवण्यात आला असावा, जो जमिनीवर पडला, यामुळे खाली असलेले मातीचे मडकं फुटले असावे असा अनुमान संशोधकांनी व्यक्त केला आहे. या खोलीचा पवित्र स्थान म्हणून वापर करण्यात आला असावा, येथे एका युवतीची कवटी सापडली असून तिच्या छातीवर एक मोठा दगड ठेवण्यात आला होता. तिला हलण्यापासून रोखण्यासाठी हे करण्यात आले असावे असा संशोधकांचा अनुमान आहे. या युवतीला गरोदरपणामुळे मारले गेले असावे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या ठिकाणी पुरातत्व सर्वेक्षण 15 वर्षांपूर्वी सुरू झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.