ग्वाटेमालामध्ये 3 हजार वर्षे जुन्या शहराचे अवशेष
प्राचीन मानवी संस्कृतीबद्दल होणार खुलासा
मध्य अमेरिकन देश ग्वाटेमालामध्ये सुमारे 3000 वर्षे जुन्या माया संस्कृतीच्या शहराचे अवशेष शोधण्यात आले आहेत. पुरातत्वतज्ञांना या शोधात पिरॅमिड आणि स्मारकं मिळाली असून ती एका महत्त्वपूर्ण औपचारिक स्थळाच्या स्वरुपात याच्या महत्त्वाला दर्शवितात.
या प्राचीन शोधामुळे प्राचनी मानवी संस्कृतीविषयी मोठे खुलासे होऊ शकतात असे तज्ञांचे सांगणे आहे. माया संस्कृती सुमारे ख्रिस्तपूर्व 2000 साली निर्माण झाली आणि 400-900 सालादरम्यान ती सर्वात विकसित झाली होती. ही संस्कृती दक्षिण मेक्सिको, ग्वाटेमाला, बेलीज, अल साल्वाडोर आणि होंडुरास येथे फैलावलेली होती. या देशांमध्ये माया संस्कृतीचे अवशेष मिळत असतात. ग्वाटेमाला आणि स्लोवाक पुरातत्वतज्ञांनी आक्सैक्टुन पार्कच्या क्षेत्रांमध्ये 16 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या या शहराचा शोध लावला आहे. त्यांनी या शहराला लॉस अबुएलोस नाव दिले आहे. हे शहर जवळपास ख्रिस्तपूर्व 800-500 कालखंडामधील आहे. हे मेक्सिकन सीमेनजीक पेटेनच्या जंगलक्षेत्रात माया संस्कृतीच्या सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण औपचारिक केंद्रांपैकी एक होते असे मानले जाते. ग्वाटेमालाच्या संस्कृती मंत्रालयानुसार येथे 33 मीटर उंच पिरॅमिड आढळला असून त्यात त्या काळातील भित्तिचित्र आणि एक आकर्षक कालवाप्रणाली आहे.
लॉस अबुएलोस नाव का
या स्थळाला लॉस अबुएलोस नाव खास कारणामुळे देण्यात आले आहे. याचा स्पॅनिश भाषेतील अर्थ ‘आजी-आजोबा’ आहे. या ठिकाणी आढळून आलेल्या जोडप्याच्या दोन मानवी मूर्तींवरून हे नाव देण्यात आले आहे. या मूर्ती ख्रिस्तपूर्व 500-300 कालखंडामधील आहेत. या मूर्ती पूजेच्या प्राचीन अनुष्ठान प्रथांशी निगडित असू शकतात. नवे शोधण्यात आलेले शहर हे उआक्सॅक्टुनच्या महत्त्वपूर्ण पुरातत्वस्थळापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. येथे उल्लेखनीय वास्तुशिल्प दिसून येतात, ज्यात पिरॅमिड आणि स्मारक अद्वितीय आइकनोग्राफीने तयार करण्यात आले आहे. या स्थळांचा समूह एक शहरी त्रिकोण निर्माण करणारा आहे.