For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला प्रवासी-विद्यार्थिनींशी उद्धट वर्तन, कंडक्टरला बस्तवाड ग्रामस्थांकडून घेराव

10:42 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला प्रवासी विद्यार्थिनींशी उद्धट वर्तन   कंडक्टरला बस्तवाड ग्रामस्थांकडून घेराव
Advertisement

वार्ताहर/बैलहोंगल 

Advertisement

प्रवासी महिला व विद्यार्थीनींशी उद्धट वर्तन करणे, थांब्यावर बस न थांबवणे तसेच अनेक बाबतीत इतरांशी हुज्जत घालणाऱ्या राज्य परिवहन बसच्या कंडक्टरला हलगा, बस्तवाड ग्रामस्थांनी घेराव घालून कंडक्टरला चांगलाच धडा शिकविल्याची घटना हलगा गावच्या बसस्थानकावर मंगळवारी घडली. याविषयी माहिती अशी की, बेळगाव ते बस्तवाड गावच्या राज्य परिवहन बसवर महांतेश नामक बसवाहक हा सेवा करत आहे. तो गेल्या कांही महिण्यापासून या मार्गावर जाणाऱ्या प्रवासी महिला व विद्यार्थीनींशी बसमध्ये उद्धट वर्तन करत असे. त्याच्या या धक्कादायक प्रकाराला बस्तवाड ग्रामस्थ वैतागले होते.

अनेकवेळा ग्रामस्थांशी बस थांबवून त्यांच्याशी हुज्जत घालत असे. शाळा कॉलेजच्या मुलांना तर तो नाहक त्रास देत असल्याचा आरोप मुलांनी पालकांसमोर तक्रार केली होती. यावरूनच मंगळवारी त्याच्या वर्तणुकीचा प्रकार पुन्हा नजरेस आल्याने मंगळवारी सकाळी सदर बस हलगा पेट्रोलपंपासमोर आली असता मुलांनी बस अडवून त्याला वेठीस धरले. यावेळी गावचे अभय अवलक्की. वरदराज कडेमनी, बाळसाहेब सामजी, संजीव पाटील, संदीप सैबनावर, हिरा देसाई, सुदर्शन शिंत्रे व इतरांनी त्याला त्याच्या वर्तणुकीबद्दल चांगलेच सुनावले. सदर वाहकावर कारवाई होईपर्यंत बस न सोडण्याचा इशारा दिला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.