कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना आरटी-पीसीआर अनिवार्य

06:36 AM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोरोना चाचणी नियमांची कडक अंमलबजावणी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची असेल, तर कोरोना ओळखणारी आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत दक्षतेचा एक उपाय म्हणून मंत्र्यांसाठी ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर जाहीर सभेत भाषण करणार असतील, तर त्यांच्यासमवेत व्यासपीठावर जे कोणी उपस्थित असतील, त्यांना त्यांचे आरटी-पीसीआर परिक्षण प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. अन्यथा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर स्थान मिळणार नाही, असे स्पष्ट केले गेले आहे.

रुग्णसंख्या वाढती

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता ती 7 हजार 121 पर्यंत पोहचली आहे. बुधवारी 306 नवे रुग्ण आढळले असून कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या बुधवारी 6 होती. केरळमध्ये सर्वाधिक 114 रुग्ण बुधवारी एका दिवसात आढळले असून त्या राज्यातील एकंदर संख्या 1,223 इतकी आहे. दिल्लीत सक्रीय रुग्णसंख्या 757 असून पश्चिम बंगालमध्ये ती 747 आहे. महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागला असून एकंदर संख्या 615 आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 229 रुग्ण आढळले असून राजस्थानात संख्या 138 आहे.

दक्षता घेण्याची सूचना

सर्वसामान्य लोकांनी कोरोनामुक्त राहण्यासाठी दक्षता घेण्याची आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केली आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा उपयोग आणि शक्यतो सामाजिक अंतर राखणे हे व्यक्तिगत पातळीवर केल्यास ते कोरोनाची लागण टाळण्यासाठी उपयुक्त आहे. अद्याप, परिस्थिती नियंत्रणात असून चिंतेचे किंवा घबराटीचे कारण नाही. तथापि, दक्षता घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले असून केंद्र सरकार स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article