For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या पथसंचलन

12:19 PM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या पथसंचलन
Advertisement

संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरात भव्य पथसंचलन : लिंगराज कॉलेज मैदानावर होणार सांगता

Advertisement

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगावच्यावतीने विजयादशमीनिमित्त रविवार दि. 12 रोजी पथसंचलन करण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वा. सरदार्स मैदान येथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे.. शहरात पथसंचलनाचे दोन मार्ग करण्यात आले असून, त्याद्वारे पथसंचलन केले जाणार आहे. लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य पथसंचलन सोहळा होणार आहे. पहिल्या मार्गाला सायंकाळी 5 वा. सरदार्स मैदानापासून सुरुवात होणार असून, कॉलेज रोडमार्गे राणी चन्नम्मा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चव्हाट गल्ली, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, भडकल गल्ली, खडक गल्ली कॉर्नर, कचेरी रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनि मंदिर, कुलकर्णी गल्ली येथून टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, धर्मवीर संभाजी चौक मार्गे लिंगराज कॉलेज मैदान येथे सांगता होईल.

Advertisement

दुसऱ्या मार्गाला सायंकाळी 5 वा. सरदार्स मैदानापासून सुरुवात होऊन लिंगराज कॉलेज, देसाई चौक, कंग्राळ गल्ली, काकतीवेस, स्वामी विवेकानंद मार्ग, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, समादेवी गल्ली, खडेबाजार, हंस टॉकीज रोड, कडोलकर गल्ली, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, बसवाण गल्ली मार्गे टिळक चौक, धर्मवीर संभाजी चौक, लिंगराज कॉलेज येथे सांगता होणार आहे. स्वयंसेवकांनी गणवेश घालून पथसंचलनामध्ये सहभागी व्हावे. तसेच नागरिकांनी रांगोळ्या, तोरण तसेच भगव्या ध्वजाचे पुष्पार्चन करून स्वागत करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.