For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मथुरेत 25-26 रोजी आरएसएस कार्यकारिणी

07:00 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मथुरेत 25 26 रोजी आरएसएस कार्यकारिणी
Advertisement

दोन दिवशीय बैठकीत समकालीन समस्यांवर चर्चा अपेक्षित : संघटनात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्याबाबतही विचारमंथन होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे होणार आहे. 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी होणारी ही सभा पारखम गावात आयोजित करण्यात आली आहे. दरवषी दिवाळीच्या अगोदर अशा बैठकीचे आयोजन केले जाते. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सहकारी सरकार्यवाह आणि कार्यकारिणी सदस्यांसह अखिल भारतीय कार्य विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत देशातील समकालीन समस्यांवर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे विचार आणि विजयादशमीनिमित्त केलेले भाषण या महत्त्वाच्या विषयांवरही विचारमंथन होणार आहे. तसेच मार्च 2024 मधील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील विषय आणि संघाच्या कार्याच्या विस्ताराची माहिती दिली जाईल. 2025 मध्ये आरएसएसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होतील. पारखम गावात होणाऱ्या या बैठकीत विजयादशमी 2025 पर्यंत या संदर्भात निश्चित केलेले संघटनात्मक लक्ष्य पूर्ण करण्यावरही चर्चा होणार आहे.

Advertisement
Tags :

.