कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : साताऱ्यात यशवंत बँकेत 112 कोटींचा गैरव्यवहार ; 50 जणांवर गुन्हा दाखल;

05:30 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                           यशवंत बँकेत तब्बल 112 कोटींचा गैरव्यवहार उघड

Advertisement

कराड : रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणलेल्या आणि ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या फलटण मुख्यालय असलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेचे शासकीय लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, ३६ संचालक, ५ सेवकांसह ५० जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार असल्याचे उघडकीस आल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालबधीत झालेल्या लेखापरीक्षण आणि १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ अशा लेखापरीक्षण पूर्व कालावधीत बँकेत कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत बाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ,

परशराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगांवकर, विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सुरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत बँकेचे अध्यन, कर्मचारी व संचालकांनी ९ औं गस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ यादरम्यानच्या कालावधीत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रूपयांच्या रकमेचा अपहार केला. त्यासाठी बोगस कर्ज प्रकरणे

करून या प्रकरणांसाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. कर्जास तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण करून जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडली. त्याद्वारे निधीचा उद्देशबाह्या विनियोग करून तुतीय पश्नांकडे निधी वळवला. तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी तयार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास ए. पी. आय. सी. बाघमोडे करीत आहेत.

195 बोगस कर्ज खाती

यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यन शेखर चरेगावकर यांच्यासह ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. संबधितांनी त्यांची कर्तव्ये पार न पाडता, पदाचा गैरवापर करुन बँकेच्या ठेवीदार व सभासदांच्या हितास बाधा निर्माण केली आहे. त्यांनी संगनमताने अपहार केला असून त्यात १९५ बोगस कर्ज खाती असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement
Tags :
maharastrasatara crimesatra newsyashawany bank satraYashwant Bank Fraud
Next Article