आरपीडी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
बेळगाव : एस के संस्थेच्या राणी पार्वती देवी कला वाणिज्य महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव कॉलेजच्या स्व.राजे चिंतामणराव पटवर्धन क्रीडांगणावर दि. 25 आणि 26 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजयकुमार पाटील होते. कार्यक्रमाचा प्रारंभ ध्वजारोहणांनी करण्यात आला. प्रा. डॉक्टर अभय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक आणि स्वागत क्रीडा आणि शारीरिक शिक्षण प्रशिक्षक डॉ. रामकृष्ण एन. यांनी केले. क्रीडा प्रतिनिधी टीना वानखडे हिने विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्तीची शपथ दिली. प्रा. विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या भारतीयांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. सुभाष पाटील यांनी कलागुणांना जोपासण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी मनोवेदक संचलन केले. यावेळी गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, रिले आदी स्पर्धाचे, स्पर्धकांचे आयोजन दोन दिवस करण्यात आले होते.
महाविद्यालयाची जीएस प्रभा काकडे, पद्मश्री, श्रीशैलगौडा, मानसी मेलगे, सक्षम जाधव, जान्हवी, स्नेहा भोसले, प्रणाली डुकरे, आनंद टिटमबी, स्वप्निल पाटील आदी विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्र्रम घेतले. स्नेहा भोसले, प्रणाली डुकरे, राधिका पाटील, टीना वानखेडे, आनंद टिटमबी, स्टीफन, जान्हवी मंडोळकर, मानस मेलगे विद्यार्थी यांनी क्रीडा महोत्सवामध्ये विशेष प्रदर्शन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. अभय पाटील व प्रा. विजय पाटील, डॉ. एस. एच. पाटील,प्रा. एम. एस. कुरणी, प्रा. सविनय सीमनगौडर, प्रा. वैशाली हणमगौंड, ग्रंथपाल संध्या कोरडे, डॉ. रामकृष्ण एन., डॉ. हरीश कोलकार यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. रामकृष्ण एन., सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्र्रम घेतले. अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आभार क्रीडा प्रशिक्षक डॉक्टर रामकृष्ण एन. यांनी मांडले. संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर आणि व्यवस्थापन मंडळाच्या प्रोत्साहनाने क्रीडा स्पर्धा झाली. समालोचन प्रा. विजयकुमार पाटील यांनी केले.