For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरपी सिंग, प्रज्ञान ओझा राष्ट्रीय निवड समितीत

06:00 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
आरपी सिंग  प्रज्ञान ओझा राष्ट्रीय निवड समितीत
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या राष्ट्रीय निवड समिती पॅनेलमधून एस शरथ आणि सुब्रतो बॅनर्जी यांची मुदत संपल्यानंतर भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंग आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा हे राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य बनणार आहेत. 2007 च्या टी-20 विश्वचषक विजयाचा एक हिरो आरपी ज्याने इंग्लंडमधील त्यानंतरच्या कसोटी मालिकेतही उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, तो मध्य विभागातून  उत्तर प्रदेशसाठी क्रिकेट खेळले आहे. 2016-17 मध्ये रणजी करंडक जिंकणाऱ्या पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाचा तो भाग होता. आरपी सिंग सुब्रतो बॅनर्जी यांची जागा घेतील तर दक्षिणेकडून, 100 पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा हा स्वयंचलित पर्याय आहे

शरथ यांच्या ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून तिलक नायडू यांच्या जागी शरथ येतील. आरपी आणि प्रज्ञान या दोन खेळाडूंना अर्ज करण्यास सांगितले गेले आहे आणि हे स्पष्ट आहे की क्रिकेट सल्लागार समिती बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दोन्ही नावांना मंजुरी देण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयने वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये 40 वर्षांचे होणारे आरपी यांनी 82 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 124 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. ओझा हा एक कसोटीतज्ञ होता, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 144 आंतरराष्ट्रीय विकेट्सपैकी 113 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या,

Advertisement

Advertisement
Tags :

.