रॉयल मालवणी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अभय परब
उपाध्यक्षपदी डॉ . सिद्धू सकपाळ ; सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा उद्दिष्टे घेऊन अधिकृत नोंदणी
आचरा प्रतिनिधी
मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देणे एवढाच उद्देश न ठेवता आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने आरोग्य सेवेसोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण याबाबीतही योगदान द्यावे या उदेशाने मालवण तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येत स्थापन केलेल्या रॉयल मालवणी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ . अभय परब तर उपाध्यक्ष पदी डॉ सिद्धू सकपाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव पदी डॉ अमोल हुले,खजिनदार डॉ स्वप्नील भोगटे, सल्लागार म्हणून डॉ नसीर पटवेलकर,डॉ राहूल वझे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ सुनील साळुंखे, डॉ राहुल चिंदरकर, डॉ रोहित डगरे, डॉ प्रथमेश वालावलकर, डॉ हर्षद पवार ,डॉ धनंजय सावंत, डॉ धनंजय आचरेकर यांची निवड करण्यात आली. यासाठी डॉ विवेक रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. याबाबत बोलताना अध्यक्ष अभय परब, उपाध्यक्ष सिद्धू सकपाळ यांनी सांगितले कीमालवण तालुक्यात आरोग्य सेवा देता देता क्रिकेट च्या माध्यमातून एकत्र येऊन आमच्या मध्ये निर्माण झालेल्या जिवलग मैत्रीच्या नात्यातून सामाजिक कार्याची आवड असलेल्या आम्ही डॉक्टरांनी सेवाभावी संस्थेत याचे रूपांतर केले. याच वर्षी या ग्रुपने सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमिअर लीग या क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते संपूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर यात सहभागी झाले होते. पुढेही वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, पशुसंवर्धन, पर्यावरण पूरक. अशी अनेक उद्दिष्टे घेऊन ही संस्था काम करणार आहे. . जिल्ह्यात नर्सिंग कॉलेज व्हावे आणि त्यातून आरोग्य सेवेला अजून उभारी मिळावी या आणि अशा सारखे अनेक उपक्रम करावेत असे स्वप्न या संस्थेचे असल्याचे त्यांनी सांगितले