रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकारग्रहण समारंभ उद्या
रोटेरियन विनायक (संदीप) नाईक यांची २०२५-२६ या सालाकरीता अध्यक्षपदी निवड
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या २०२५–२०२६ रोटरी वर्षासाठीच्या संचालक मंडळाच्या अधिकारग्रहण समारंभाचे आयोजन उद्या शुक्रवार, ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता फाउंड्री क्लस्टर हॉलमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवीन नेतृत्वाच्या कार्यकाळाची औपचारिक सुरुवात होणार आहे. अध्यक्षपदी रोटेरियन विनायक (संदीप) नाईक, सचिवपदी डॉ. संतोष पाटील यांची तर रोटेरियन सुनीश मेत्राणी यांची खजिनदारपदी निवड करण्यात येणार आहे. यांच्यासह नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा उद्घाटन समारंभ पीडीजी रोटेरियन अविनाश पोतदार यांच्या हस्ते पार पडणार असून, सहाय्यक गव्हर्नर रोटेरियन राजेशकुमार तळेगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मावळते अध्यक्ष रोटेरियन सुहास चांडक आणि मावळत्या सचिव रोटेरियन डॉ. मनीषा हेरेकर देखील या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित राहतील.
२०२५–२०२६ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या संचालक मंडळात खालील सदस्यांचा समावेश आहे
- अध्यक्ष : रोटेरियन विनायक (संदीप) नाईक
- अध्यक्ष-निवड : रोटेरियन अमित साठे
- उपाध्यक्ष : रोटेरियन डॉ. मनीषा हेरेकर
- मावळते अध्यक्ष : रोटेरियन सुहास चांडक
- सचिव : रोटेरियन डॉ. संतोष पाटील
- सहसचिव : रोटेरियन शैलेश मांगले
- खजिनदार : रोटेरियन सुनीश मेत्राणी
- क्लब ट्रेनर : रोटेरियन संजय कुलकर्णी
- क्लब सेवा संचालक : रोटेरियन पराग भंडारी
- व्यवसाय सेवा संचालक : रोटेरियन डॉ. शिल्पा कोडकणी
- जनसंपर्क संचालक : रोटेरियन मनोज पै
- समाजसेवा संचालक : रोटेरियन मुकुंद बंग
- युवा सेवा संचालक : रोटेरियन चेतन पै
- आंतरराष्ट्रीय सेवा संचालक : रोटेरियन अक्षय कुलकर्णी
- सर्जंट अॅट आर्म्स (ज्येष्ठ) : रोटेरियन मनोज हुईलगोळ
- सर्जंट अॅट आर्म्स (कनिष्ठ) : रोटेरियन नंदन भंडारी
- कार्यक्रम समन्वयक : रोटेरियन मनोज मायकेल
नवीन अध्यक्ष रोटेरियन विनायक (संदीप) नाईक हे टेक्नोक्विप मार्केटिंग, इन्स्पिरॉन एंटरप्राइझ आणि इंडस्ट्रियल अॅक्सेसरीज कंपनीचे मालक आहेत. या कंपन्या ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रातील उत्पादन गरजांनुसार विशेष सोल्युशन्स पुरवतात. त्यांनी १९९७–९८ मध्ये रोटरी क्लबमध्ये प्रवेश केला आणि क्लबच्या अनेक महत्वाच्या उपक्रमांचे नेतृत्व केले आहे, त्यात “अन्नोत्सव” हा प्रमुख उपक्रम आहे.
नूतन सचिव रोटेरियन डॉ. संतोष बसवराज पाटील हे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि आरोग्य क्षेत्रातील उद्योजक आहेत. सध्या ते डॉ. बी.एम. पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, काळी आंबराई, बेळगावचे भागीदार व मालक असून, दिशा डायग्नोस्टिक्स अॅण्ड कार्डियाक सेंटरचे संचालक, तसेच कॉलेज रोड हॉस्पिटलमध्ये कन्सल्टिंग सर्जन म्हणून कार्यरत आहेत. २०१३ मध्ये ते क्लबमध्ये सामील झाल्यापासून त्यांनी अनेक पदांवर काम केले असून, “अन्नोत्सव २०२४” चे ते अध्यक्ष होते.
नूतन खजिनदार रोटेरियन सुनीश मेत्राणी हे एक उद्योगपती असून, स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लि.चे संचालक आहेत. तसेच ते एमबीए पदवीधर असून, २०१७ मध्ये क्लबमध्ये सामील झाले. त्यांनी “अन्नोत्सव २०२४” व “SCAW” सारख्या प्रमुख प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. हा समारंभ म्हणजे नेतृत्व, मैत्रीभाव आणि रोटरीच्या मूल्यांचे उत्सव असेल, कारण रोटरी क्लब ऑफ बेळगाव आपल्या ८५ व्या वर्षात प्रवेश करत असून, समाजोपयोगी आणि प्रभावी सेवा कार्यासाठी सज्ज आहे.