विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा रोनाल्डोचा विक्रम
वृत्तसंस्था / लिस्बन
आणखी एक गोल, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आणखी एक विक्रम. मंगळवारी हंगेरीविरुद्धच्या 2-2 अशा बरोबरीत पोर्तुगालसाठी दोनदा गोल केल्यानंतर 40 वर्षीय रोनाल्डो विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.
22 व्या मिनिटाला जवळून केलेला त्याचा पहिला गोल रोनाल्डोचा विश्वचषक पात्रता फेरीतील 40 वा गोल होता. त्याने ग्वाटेमालाचा माजी खेळाडू कार्लोस रुईझसोबतची बरोबरी तोडली. त्यानंतर अल नासर स्ट्रायकरने पहिल्या हाफच्या स्टॉपेज वेळेत दुसरा गोल केला आणि त्याने खेळलेल्या 50 विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यात 41 गोलचा विक्रम केला. रोनाल्डोने आता पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 143 गोलचा विक्रम केला आहे. तो 78 व्या मिनिटाला 2-1 असा गोल करत मैदान सोडला आणि हंगेरीने डोमिनिक स्झोबोस्झलाईच्या मदतीने स्टॉपेज वेळेत बरोबरी साधली. ज्यामुळे पोर्तुगालला दोन गट सामने शिल्लक असताना विश्वचषकात स्थान मिळवण्यापासून रोखले. पोर्तुगाल अजूनही ग्रुप एफमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या हंगेरीवर पाच गुणांनी आघाडीवर आहे.