कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोहयो महिलांच्या आरोग्यासाठी खाते सक्रिय

11:03 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कामाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी, शिवाय इतरही सुविधा

Advertisement

बेळगाव : अकुशल कामगारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या रोहयो योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी आरोग्य अभियान राबविण्यात आले आहे. थेट कामाच्याठिकाणी मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यासाठी रोहयोंतर्गत प्राथमिक आरोग्याची तपासणी केली जात आहे. शिवाय आरोग्याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात 45 हजारहून अधिक रोहयोंना काम दिले जात आहे. शिवाय या योजनेचा विस्तार वाढवला गेला आहे. दिव्यांग आणि वयोवृद्धांनाही यामध्ये सामावून घेतले गेले आहे. त्यामुळे एकूण काम करणाऱ्या मजुरांची संख्याही वाढली आहे. शिवाय यंदा प्रतिदिवस 350 वरून 370 रुपयांपर्यंत मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता रोहयोला पसंती देऊ लागली आहे.

Advertisement

जिल्हा पंचायतीकडून रोहयोंसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. याअंतर्गत रोहयो मजुरांना प्रथमोपचार कीट, पाण्याची बाटली आणि सावलीची व्यवस्था केली जात आहे. रोहयोंना शंभर दिवस काम देणे अनिवार्य आहे. मात्र, काही ग्राम. पं.कार्यक्षेत्रामध्ये काम नसल्याच्या तक्रारीही मजुरांनी केल्या आहेत. मात्र, याबाबत जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी आदेश दिले आहेत. अतिरिक्त दिवस काम करण्याचे निर्देश जि. पं. ने दिले आहेत. रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. विशेषत: कामाच्या ठिकाणी जाऊन आरोग्य खात्याकडून रोहयोंची वेळोवेळी आरोग्याची काळजी घेतली जात आहे. शिवाय कष्टकरी महिलांना पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. महिलांकडून लहानसहान आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी आरोग्य खाते अधिक सक्रिय झाले असून कामाच्या ठिकाणी महिलांना आरोग्याबाबत माहिती दिली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article