For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयपीएल’मध्ये रोहित मार्गदर्शक शक्ती राहील : हार्दिक

06:56 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आयपीएल’मध्ये रोहित मार्गदर्शक शक्ती राहील   हार्दिक
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने आगामी हंगामापूर्वी संघाने नेतृत्वात अनपेक्षित बदल जाहीर केलेला असला, तरी माजी कर्णधार रोहित शर्मा आयपीएलदरम्यान आपल्यासाठी मार्गदर्शक शक्ती राहील, असे म्हटले आहे. मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केलेला पंड्या 2024 च्या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघात कर्णधार म्हणून परतला आहे.

मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपदे मिळवून दिल्यानंतरही रोहितला आश्चर्यकारकपणे हटवून त्याचे स्थान पंड्याला देण्यात आले आहे. ‘परिस्थिती काही वेगळी असणार नाही, रोहित माझ्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल. या संघाने जे काही मिळवले आहे ते त्याच्या नेतृत्वाखाली मिळवलेले आहे आणि मला तेच पुढे करायचे आहे. त्याचा हात माझ्या खांद्यावर राहील, असे असे पंड्याने येथे प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

Advertisement

रोहितला हटविल्याबद्दल चाहत्यांकडून जो संताप व्यक्त झाला त्याविषयी विचारले असता पंड्या म्हणाला की, आम्ही चाहत्यांचा आदर करतो, पण आम्ही खेळावर आणि काय आवश्यक आहे यावर लक्ष केंद्रीत करतो. मी नियंत्रण करण्यायोग्य गोष्टींवरच लक्ष केंद्रित करत असतो. चाहत्यांना सर्व अधिकार आहेत आणि मी त्यांच्या मतांचा आदर करतो, असे त्याने पुढे सांगितले.

ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान झालेल्या घोट्याच्या दुखापतीनंतर प्रदीर्घ काळ बाहेर राहावे लागलेला हा स्टार अष्टपैलू खेळाडू त्यातून सावरल्यानंतर आता आयपीएलमधून अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ‘मला शारीरिकदृष्ट्या कोणतीही समस्या नाही. सर्व सामने खेळण्याची माझी योजना आहे. आयपीएलमध्ये मी फारसे सामने गमावलेले नाहीत. तांत्रिकदृष्ट्या, मी तीन महिने बाहेर होतो. ती एक विचित्र दुखापत होती आणि माझ्या आधीच्या दुखापतींशी त्याचा काहीही संबंध नव्हता. मी चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या भरात दुखापत झाली’, असे पंड्या म्हणाला.

यावेळी सोबत बसलेला मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यालाही रोहित आणि त्याच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले. बाउचर त्यावर म्हणाला की, रोहित शानदार फॉर्ममध्ये आहे. तो मैदानात उतरून आपला खेळ खेळण्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आम्ही त्याची इंग्लंडविऊद्ध फलंदाजी पाहिली आहे. तो अप्रतिम फलंदाजी करत आहे.

Advertisement
Tags :

.