For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित दाहिया कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत

06:20 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहित दाहिया कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत
Advertisement

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : भारतीय महिलांना 6 तर पुरुषांना 3 पदके

Advertisement

 वृत्तसंस्था/ बिश्केक, किर्गीजस्तान

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रोहित दाहियाला कांस्यपदकाच्या लढतीत उझ्बेकच्या अव्वल मल्लाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला पदकाविना रहावे लागले. ग्रीको रोमन कुस्ती प्रकारातील ही भारताची शेवटची लढत होती. भारताला या प्रकारात एकही पदक मिळविता आले नाही. या स्पर्धेत भारतीय महिलांनी एकूण 6 तर पुरुषांनी 3 पदके पटकावली.

Advertisement

भारताच्या जवळपास सर्वच मल्लांना ग्रीको रोमन प्रकारात झगडावे लागत असताना दाहिया या एकमेव मल्लाने 82 किलो वजन गटात कांस्यपदकाच्या फेरीत प्रवेश केला होता. पण पदकाच्या या लढतीत त्याला उझ्बेकच्या मुखम्मदकोदिर रसुलोव्ह या अव्वल मानांकित मल्लाकडून गुणांवर पराभव स्वीकारावा लागला. अन्य भारतीयांमध्ये परवेश (60 किलो गट), विनायक सिद्धेश्वर पाटील (67 किलो), अंकित गुलिया (72 किलो) यांना प्राथमिक फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र 2022 यू-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला दाहिया उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या योशिदा तायझोकडून 2-7 अशा गुणांनी पराभूत झाला असला तरी त्याला कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळाले. उपांत्यपूर्व फेरीत ज्याच्याकडून त्याचा पराभव झाला होता, त्या मल्लाने अंतिम फेरी गाठल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती.

60 किलो गटात परवेश उपउपांत्यपूर्व फेरीतच कझाकच्या गॅलीम कब्दुनासारोव्हकडून तांत्रिक सरसतेवर पराभूत झाला तर 67 किलो गटात विनायक पाटीलला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या हान्जेइ चुंगकडून 7-1 अशा गुणांनी पराभूत झाला. 72 किलो गटात कझाकच्या आदिलखान सताएव्हने उपांत्यपूर्व फेरीत अंकित गुलियाला चीतपट पराभूत केले.

त्याआधी सोमवारी पाच ग्रीको रोमन भारतीय मल्ल अर्जुन हलकुर्की (55 किलो), उमेश (63 किलो), साजन (77 किलो), अजय (87 किलो), मेहर सिंग (130 किलो) यांचे प्राथमिक फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. भारतीय महिलांनी मात्र या स्पर्धेत एकूण सहा पदके पटकावली, त्यात 3 रौप्य व 3 कांस्यपदकांचा समावेश आहे तर पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात उदितने (57) रौप्य व अभिमन्यू (70 किलो), विकी (97 किलो) यांनी कांस्यपदके मिळविली.

Advertisement
Tags :

.