कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आशियाई ज्युडो स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रोहिणी पाटील

10:30 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव युवा सबलीकरण  आणि क्रीडा विभाग (डीवायईएस) येथील ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांची 13 ते 17 जुलै 2025 दरम्यान तैपेई, तैवान येथे होणाऱ्या आगामी आशियाई ज्युडो कप 2025 साठी भारतीय ज्युनियर महिला ज्युडो संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने नियुक्ती करण्यात आली आहे. चंदगड (अष्टे) येथील रोहिणी पाटील 2024 पासून भारतीय ज्युडो संघात सातत्याने योगदान देत आहेत, यापूर्वी प्रशिक्षक म्हणून  अकताऊ, कझाकस्तान येथील सिनियर आशियाई ज्युडो ओपन चॅम्पियनशिप 2024, हाँगकाँग चीन येथील सिनियर आशियाई ज्युडो ओपन चॅम्पियनशिप 2024,रोहिणी युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते (डीवायईएस) बेळगाव येथे 2003 पासून ज्युडो प्रवास सुरू केला, या खेळासाठी 22 वर्षे खेळाडू ते प्रशिक्षकपदा पर्यंत खडतर प्रवास केला आहे.

Advertisement

2019 मध्ये पटीयाला (पंजाब) येथील एनआयएस डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (2018-19 बॅच) पूर्ण केल्यानंतर तिच्या कोचिंग कारकिर्दीला सुरुवात केली ती एम. ए. फिलॉसॉफी पदवीधारक देखील आहे. खेळाडू म्हणून तिची कामगिरी तितकीच प्रभावी आहे दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक विजेती, 2009 सालाचा एकलव्य पुरस्कार  व दुसरा  ब्लॅक बेल्ट धारक आणि भारतीय ज्युडो फेडरेशनने घेतलेल्या परीक्षेत अव्वल स्थान मिळवत‘अ‘ ग्रेड भारतीय ज्युडो फेडरेशनन राष्ट्रीय पंच प्रमाणित आहेत. सध्या, ती बेळगाव येथील डीवायईएस इनडोअर हॉलमध्ये 100 हून अधिक ज्युडो खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत तर येथील खेळाडूना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करत आहेत. तिला युवा सबलीकरण  आणि क्रीडा विभागाचे आधिकारी श्री. श्रीनिवास बी. यांचे सहकार्य लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article