कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बळकावलेल्या जमिनी रोहनने थेट विकल्या परप्रांतीयांना

12:52 PM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात उघड

Advertisement

पणजी : जमीन बळकाव प्रकरणातील रोहन हरमलकर याने परप्रांतियांना विकलेल्या जमिनीची किंमत 2 हजार कोटी ऊपये असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली, हरियाणा तसेच इतर राज्यांतील ग्राहकांना हरमलकर याने जमिनी विकल्या आहेत. या प्रकरणात आणखी अनेक बड्या धेंडांचा सहभाग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही लवकरच अंमलबजावणी संचालनालयाचे (इडी) छापे पडण्याची शक्यता आहे. रोहन हरमलकर याने ज्या जमिनी बेकायदेशीररित्या बळकाविल्या त्या एकतर कायदेशीर वारस नसलेल्या आहेत किंवा मूळ मालकाचा मृत्यू झालेल्यांच्या आहेत, असे आढळून आले आहे. एखाद्या जमिनीचा खरा मालक अनेक वर्षे गोव्यात न येता परदेशात राहत होता, अशांच्याही जमीन हडप करण्यात आल्या आहेत.

Advertisement

अशा प्रकारच्या जमिनी शोधून काढून इतर संशयितांसह फसवेगिरी करून रोहन हरमलकर बनावट कागदपत्रे तयार करत होता. महसूल नोंदींमध्ये बोगसगिरी करून त्या जमिनी विकत होता, असे ईडीने म्हटले आहे. हरमलकर काही जमीन खरेदीदारांच्या वतीने काम करत होता. जेणेकरून गोव्याबाहेरील लोकांना या जमिनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळू शकतील. काही प्रकरणांमध्ये, संशयित हरमलकर याने ग्राहकांना फसवल्याचेही तपासात उघड झाले आहे. हरमलकरचे राज्याबाहेर अनेक ग्राहक होते, ज्यात दिल्ली-एनसीआर आणि हरियाणासह इतर ठिकाणांचा समावेश होता, असे इडीने म्हटले आहे.

शुक्रवारी, ईडीने एका कथित जमीन घोटाळ्dयाच्या संदर्भात रोहन हरमलकर याच्या कार्यालयाची आणि निवासस्थानाची झडती घेऊन 600 कोटी ऊपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. या कारवाईत उत्तर गोव्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये 1 हजार कोटी ऊपयांपेक्षा जास्त किमतीच्या बेकायदेशीर जमिनींची कागदपत्रे देखील उघडकीस आली. यामध्ये बनावट मालकी हक्कपत्रे समाविष्ट आहेत, जी जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार केल्याचे दाखवितात. बार्देश तालुक्यातील हणजूण, हडफडे आणि आसगावसारख्या ठिकाणी लाखो चौरस मीटर पसरलेल्या उच्च-किमंतीच्या जमिनीची बोगस कागदपत्रे केल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article