कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोहन हरमलकरची एक हजार कोटींची जमीन कागदपत्रे जप्त

01:08 PM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईडीकडून विविध ठिकाणी छापे : हणजूण, हडफडे जमीन हडपप्रकरण

Advertisement

पणजी : गोव्यातील जमीन हडपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून रोहन हरमलकर यांच्याशी संबंधित सध्या बाजारात एक हजार कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या जमीन व्यवहारांचे दस्तावेज जप्त केले आहेत. गुऊवारी 24 व शुक्रवारी 25 एप्रिल रोजी बेकायदेशीर पैशांची देवाण घेवाणप्रकरणी (पीएमएलए) शोध मोहिमेंतर्गत जमीन हडप प्रकरणातील मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. बार्देश तालुक्यातील हणजूण, हडफडे आणि आसगाव या ठिकाणी लाखो चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करुन कोट्यावधींच्या जमीनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

या प्रकरणातील गुप्त माहितीच्या आधारे आणि त्यानंतरच्या आर्थिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन हरमलकर मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याने इतर साथीदारांसह तोतयागिरी, बनावट दस्तऐवज तयार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे इत्यादींसह फसव्या मार्गाने अनेकांच्या जमिनी बेकायदेशीर बळकाविल्या आणि त्या जमिनी दुसऱ्यांना विकल्या आहेत. जमिनींच्या खऱ्या मालकांच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे जमिनी विकल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे. बेकायदेशीरपणे जमिनी विक्रीतून मिळालेली रक्कम विविध व्यक्ती आणि बेनामी संस्थांमार्फत पुढे पाठविण्यात आल्याचेही उघड झाले आहे. बरीच रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आली आहे. काही रक्कम लक्झरी वाहनांमध्ये आणि इतर उच्च-मूल्याच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली आहे. मनी ट्रेल शोधण्यासाठी तसेच या बेकायदेशीर प्रकरणातील इतर लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि बेकायदेशीर मालमत्तेच्या व्यवहाराच्या प्रक्रियेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसह इतर व्यक्तींची भूमिका शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article