कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रॉजर्स, पालेकर क्लब विजयी

10:40 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर हमदान हुबलीवाले, प्रथम अलाबाल

Advertisement

बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित एस. बी. अलाबाल चषक 10 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स क्रिकेट क्लबने के. आर. शेट्टी लायाजचा तर प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने युनियन जिमखानाचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. हमदान हुबलीवाले, प्रथम अलाबाल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित केलेल्या या स्पर्धेत के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 111 धावा केल्या. संग्राम पाटीलने 3 चौकारासह 42, आयुष देसाईने 17, वाई सान्वीने 11 धावा केल्या. प्रतित्युतरादाखल खेळताना

Advertisement

रॉजर्स क्रिकेट क्लबने 18.1 षटकात 5 गडी बाद 112 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. हमदान हुबलीवालेने 4 चौकारांसह 29, शुभम पवार व साई पाटील यांनी प्रत्येकी 17, श्रीजीत यळ्ळूरकरने 11 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे संग्राम पाटीलने 2 तर अथर्व पाटीलने 1 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात प्रमोद पालेकर अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 132 धावा केल्या. प्रथम अलाबालने 4 चौकारासह 46, शेणव धोंडने 2 चौकारांसह 36 तर अनुपने 11 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखानाने 20 षटकात 9 गडी बाद 95 धावा केल्या. प्रणव वादनापूरने 2 चौकारासह 16, अभिमन्यूने 21 धावा केल्या. पालेकरतर्फे श्लोकने 15 धावात 3, अर्जुन होसूरकरने 9 धावात 2 तर शहन मंडल, निलेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article