For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॉजर्स क्लबची विजयी सलामी

10:03 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
रॉजर्स क्लबची विजयी सलामी
Advertisement

एन. डी. वॉरियर्स टी-20 क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित एन. डी. वॉरियर्स चषक निमंत्रितांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन सामन्यात रॉजर्स क्रिकेट क्लबने एस. के. ई. सोसायटीचा 115 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. सुनील पाटीलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या टर्फ मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अॅड. संजय कुंचनूर, प्रशांत रामगौडा, धनराज रतन व आनंद करडी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला असून या 12 संघातून साखळी सामने खेळविले जाणार आहेत. उद्घाटन सामन्यात रॉजर्स स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 184 धावा केल्या. त्यात अभिषेक पम्मारने 1 षटकार, 6 चौकारांसह 61, अवनिश हट्टीकरने 5 चौकारांसह 58, सुनील पाटीलने 1 षटकार, 3 चौकारांसह 25 तर विनायक मुजावरने 4 चौकारांसह 22 धावा केल्या. पंकज कुनालने 31 धावांत 3 तर पवन पार्सेकरने 36 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एस. के. ई. सोसायटी संघाचा डाव 11 षटकात 69 धावांत आटोपला.

Advertisement
Advertisement
Tags :

.