रॉजर्स क्लब, एसकेई अकादमीची विजयी सलामी
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयाजीत हनुमान चषक 14 वर्षा खालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवसी रॉजर्स क्रिकेट क्लबने बेळगाव स्पोर्टस् क्लब ब चा तर एसकेई अकादमीने प्रमोद पालेकर आकदमीचा पराभव करुन विजयी सलामी दिली. अवनिश हट्टीकर (रॉजर्स), देवन (एसकेई) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसुगी प्रमुख पाहुणे हनुमान स्पोर्टस्चे संचालक आनंद सोमण्णाचे, डॉ. वाली, संजय सातेरी, बाळकृष्ण पाटील, विठ्ठल कुरडेकर, प्रमोद पालेकर, सोमनाथ सोमण्णाचे, शिवानंद पाटील, ईश्वर इटगी, साई कारेकर, निखिल वाघवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात रॉजर्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडीबाद 181 धावा केल्या. त्यात अवनिश हट्टीकरनेने 9 चौकारांसह 50, श्रेयश पाटीलने 1 षटकार व 6 चौकारासह 40, सोहम गावडेने 5 चौकारांसह 26, सुजल गोरलने 3 चौकारासह 22 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब बी. संघातर्फे आयुष एम. व समर्थ यांनी प्रत्येकी 30 धावांत 2 तर अथर्व व दिगंनाथ वाली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स ब संघाचा डाव 10 षटकात 41 धावांत आटोपला. त्यात आयुषने 3 चौकारासह 13 तर दिगंनाथ वालीने 10 धावा केल्या. रॉजर्सतर्फे मोहन के. व जितीन दुर्गाईने यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात एसकेई स्पोर्ट्स अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 158 धावा केल्या. त्यात देवनने 11 चौकारांसह 74, श्रवण पाटीलने 6 चौकारांसह 54 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रमोद पालेकर क्लबचा 14.2 षटकात 99 धावांत आटोपला. त्यात अवनिशने 3 चौकारांसह 16, समर्थने 2 चौकारांसह 13, सनी सामजी व शिवराज पाटील यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. समर्थने 38 धावांत 4, रुतुने 2, समर्थ बी.ने 1 गडी बाद केला.