For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पर्श करून मानवी भावना समजणार रोबोट

06:14 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्पर्श करून मानवी भावना समजणार रोबोट
Advertisement

वैज्ञानिकांकडून अद्भूत कामगिरी

Advertisement

वैज्ञानिकांनी रोबोटसंबंधी केलेले नवे संशोधन थक्क करणारे आहे. नव्या संशोधनानुसार आता रोबोट मानवी त्वचेला स्पर्श करून त्याच्या भावना जाणू शकणार आहे. आयईईई एक्सेस नियतकालिकात प्रकाशित एका नव्या संशोधनानुसार संशोधकांनी त्वचेचा वापर करत एखादा व्यक्ती कुठल्या प्रकारची भावना अनुभवत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

स्किन कडंक्टेंसचा अर्थ त्वचा किती प्रभावीपणे संचारित करते हे मोजणे आहे.  जे सर्वसाधारणपणे घामाचा प्रभाव आणि नर्व्हमध्ये बदलामुळे बदलत राहते आणि हे मानवी भावनांच्या विविध अवस्थांचा संकेत देते.

Advertisement

या अध्ययनात पारंपरिक भावना-विश्लेषण तंत्रज्ञान यासारख्या चेहऱ्यांची ओळख आणि वाणी विश्लेषणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, कारण हे प्रकार अनेकदा चुकीचे निष्कर्ष देऊ शकतात. खासकरून जेव्हा ऑडिओ-व्हिज्युअल स्थिती आदर्श नसते. त्वचेची संवेदनशीलता एक चांगला पर्याय ठरू शकतो, जो वास्तविक काळात भावना जाणून घेण्यासाठी एक बिगर आक्रमक पद्धत प्रदान करतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

संशोधनात 33 लोकांच्या भावनात्मक प्रतिक्रिया मापण्यासाठी त्यांचे भावनात्मक व्हिडिओ दाखविण्यात आले, यामुळे त्यांच्या त्वचेची संवेदनशीलता मापण्यात आली. परिणामांनी विविध भावनांचे विशिष्ट पॅटर्न दर्शविले आहेत.  यात भीतीची प्रतिक्रिया सर्वाधिक काळापर्यंत चालणारी होती. जी विकासात्मक दृष्टीकोनातून एक इशारा तंत्राचा संकेत देते. कौटुंबिक संबंधांशी निगडित भावना, ज्या आनंद आणि दु:खाचा मिश्रण असतात, त्याकरता रिअॅक्शन सर्वात वेगळी होती.

Advertisement
Tags :

.