मानवी अपत्याला जन्म देणार रोबोट
प्रोटोटाइप 2026 मध्ये होणार लाँच
चीनचे वैज्ञानिक एका अशा जेस्टेशन रोबोटवर (गर्भधारणा करणारा रोबोट) काम करत आहेत, जो मानवी अपत्याला जन्म देऊ शकेल. याचा पहिला प्रोटोटाइप 2026 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. भ्रूणाला कृत्रिम गर्भात ठेवले जाईल, तो एका नळीतून पोषक घटक मिळवेल आणि आईच्या गर्भासारखे वातावरण मिळेल. ही प्रक्रिया गर्भधारणेपासून मुलाच्या जन्मापर्यंत असेल. एग आणि स्पर्मचे फर्टिलायजेशन कसे होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
काही कारणांमुळे पालक होता येत नसलेल्या दांपत्यांना या तंत्रज्ञानामुळे लाभ होणार आहे. या प्रकल्पावर ग्वांगजूच्या काइवा टेक्नॉलॉजी कंपनी काम करत आहे. या टीमचे नेतृत्व डॉ. झांग क्यूफेंग (सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक) करत आहेत. तंत्रज्ञान आता अत्यंत प्रगत टप्प्यात आहे. याला रोबोटच्या पोटात प्रत्यारोपित करण्याची गरज आहे, जेणेकरून एक गर्भधारणा करता येईल आणि भ्रूणाला आत विकसित होता येईल, असे क्यूफेंग यांनी सांगितले.
किती येणार खर्च
प्रोटोटाइपचा अनुमानित खर्च 11.5 लाख रुपये असेल. या तंत्रज्ञानावर नैतिक आणि सामाजिक प्रश्न उपस्थित होत आहेत. या तंत्रज्ञानाने नैतिक निहितार्थांविषयी चर्चा सुरू केली आहे. ज्यात भ्रूण-माता संबंध, शुक्राणूचा स्रोत अणि मुलावर मनोवैज्ञानिक प्रभावसंबंधी चिंता सामील आहे. जगात सुमारे 15 टक्के दांपत्य संबंधित समस्येला सामोरे जावे लागते. हे तंत्रज्ञान त्यांना नवी आशा आणि पर्याय देणार आहे. 2017 मध्ये झालेल्या एका प्रयोगात कृत्रिम गर्भ विकसित करण्यात आला होता. हा प्रकल्प त्याच्या प्रयोगाने प्रेरित आहे.