महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फरार संजय भंडारीमुळे रॉबर्ट वड्रा अडचणीत

06:29 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोपपत्रात ईडीकडून वड्रांचा उल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

फरार शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारीमुळे रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने दिल्लीच्या न्यायालयात संजय भंडारी, सीसी थंपी आणि सुमित चड्ढा विरोधात एक आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या या आरोपपत्रात काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या नावाचा उल्लेख आहे. संजय भंडारीसाठी काम करणारा सी.सी. थंपी हा रॉबर्ट वड्रा यांचा निकटवर्तीय होता असे ईडीने नमूद केले आहे.

संजय भंडारी हा पूर्वी आलिशान कार्स विदेशातून भारतात आणत धनाढ्यांना विकायचा, याच व्यवसायादरम्यान त्याची राजकीय नेत्यांशी ओळख निर्माण झाली होती. यानंतर तो शस्त्रास दलाल म्हणून काम करू लागला होता. याकरता त्याने ऑफसेट इंडिया सोलुशन्स या नावाने कंपनी स्थापन केली होती. संजय भंडारीला 2020 मध्ये ईडीच्या विशेष न्यायालयाने फरार घोषित केले होते. संजय भंडारीची आतापर्यंत 26.55 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीशी भंडारी संबंधित होता असा आरोप भाजपने अनेकदा केला आहे. वड्रा यांना भंडारीशी संबंधित लंडनमधील एक फ्लॅट मिळाला होता असा दावा ईडीने केला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article