महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इनोव्हा कारने पाठलाग करत दहा लाखांचा दरोडा

11:19 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगावच्या दोघांना कित्तूरनजीक लुटले

Advertisement

बेळगाव : बेळगावहून शिमोग्याला जाणारी कार अडवून कारमधील दोघा जणांना पिस्तुलचा धाक दाखवून दहा लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. रविवार दि. 30 जून रोजी सकाळी 6.30 ते 7 या वेळेत ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा कित्तूर पोलीस स्थानकात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोर इनोव्हा कारमधून आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement

बेळगाव येथील सुनील प्रजापत व श्रीचंदनाथ सिद्ध हे केए 17 एमए 1992 क्रमांकाच्या नेक्सॉन कारमधून शिमोग्याला जात होते. कारमध्ये दहा लाख रुपये रोकड होती. कित्तूरजवळ ही कार अडवून इनोव्हामधून आलेल्या सहा जणांनी कारमधील दोघा जणांना पिस्तुलचा धाक दाखविला आणि त्यांना धमकावत त्यांच्याजवळील रोकड पळवली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही कार अडवून रोकड व सोने पळविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दरोड्यामागे कोणते गुन्हेगार कार्यरत आहेत? याचा माग काढण्याचे काम कित्तूर पोलिसांनी हाती घेतले असून या घटनेने महामार्गावरील वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article