म्हापशात दरोडा, 50 लाख लंपास
गणेशपुरीतील डॉ. घाणेकरांचा बंगला लक्ष्य : कुटुंबीयांचे हातपाय, तोंडे बांधून साधला डाव,मोबाईल, डीव्हीडी, कारसह पळाले दरोडेखोर, पोलिस पथक बेळगावच्या दिशेने रवाना
- पोलिसांच्यामाहितीनुसारसातजण बुरखाधारी दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान दरोडा घातला.
- बंगल्याच्या खिडकीचे ग्रील कापून अगोदर एक दरोडेखोर आत घुसला. त्यानेच मुख्य दरवाजा उघडून इतर दरोडेखोरांना आत घेतले.
- डॉ. महेंद्रघाणेकरव त्यांच्या पत्नी अनुराधा यांना दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दोघांचेही हातपाय चादर व साडीने बांधले. आवाज केल्यास जीवंत मारण्याची धमकी दिली.
- दरोडेखोरएवढ्यावरचथांबले नाहीत. कुणीही आरडाओरडा करू नये म्हणून त्यांच्या तोंडात कापूस कोंबला.
- डॉ. महेंद्रयांचीआई सुहासिनी स्वत:साठी चहा करीत होती. त्यांचे हात पाठीमागे बांधून त्यांना पहिल्या मजल्यावरील बाथरूममध्ये डांबून ठेवले.
- सुहासिनीयांनीत्यांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण केली.
- दरोडेखोरांनीफ्रिजमधीलसफरचंदे, संत्री खाल्ली. अनुराधा यांनी आपल्यासाठी केलेला चहाही त्यांनी पिऊन टाकला.
- दरोडेखोरांनीडॉ. महेंद्रयांची कार घेऊन तेथून पळ काढला.
- नंतरबंगल्यातीलसर्वांनी कसेबसे स्वत:ला सोडवून घेतले.
- घटनेचीमाहितीशेजारी माजी नगरसेवक संजय मिशाळ यांना दिली.
- संजयमिशाळयांनी घाणेकर कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली.
- म्हापसापोलिसांनीतात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा सुरू केला. श्वानपथक, ठसेतज्ञ घटनास्थळी आले. थ्यानंतर तपास सुरु झाला.
दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या कारची चावी त्यांच्याकडून जबरदस्तीने घेतली. त्याच डीए-03 पी-7187 क्रमांकाच्या कारमधून सातही दरोडेखोरांनी पळ काढला. ती कार मंगळवारी दुपारी पणजी येथे मांडवी पुलाखाली आढळून आली. तेथून दरोडेखोर भाड्याच्या टॅक्सीने बेळगावमार्गे गेल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. त्या दरोडेखोरांच्या शोधात पोलिस पथक बेळगावला गेले आहे. जाताना घाणेकर कुटुंबीयांचे हिसकावलेले फोन कुठेतरी फेकून दिल्याचे समजते. हे सर्व फोन स्वीच ऑफ असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. डॉ. घाणेकर कुटुंबीयांचे नातेवाईक फोंडा येथील डॉ. नूतन देव यांनी पत्रकारांना सांगितले की, पैसे गेले खरे पण दरोडेखोरांनी घरातील कुणालाही इजा केली नसल्याने देवाचे आभार मानले पाहिजे. अन्यथा या घटनेला वेगळेच वळण लागले असते.
दरोड्याची माहिती मिळाल्यावर पोलिस महासंचालक अलोक कुमार, पोलिस महानिरीक्षक वर्षा शर्मा, पोलिस उपअधीक्षक राहुल गुप्ता, अधीक्षक तुषार वेर्णेकर, पोलिस उपअधीक्षक क्राईम तुषार लोटलीकर, उपअधीक्षक विल्सन डिसोझा, पोलिस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर अधिक तपास करीत आहेत. महेंद्र घाणेकर यांनी याबाबत लेखी तक्रार म्हापसा पोलिसस्थानकात दिली आहे.
म्हापशात सर्वत्र कॅमेरा बसवणार
उपसभापती तथा म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा म्हणाले, सकाळी या दरोड्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण पाठपुरवठा करीत आहे. काही माहिती हाती लागली आहे. ही घटना त्यांच्या घरी घडली ही दु:खाची गोष्ट. सर्वत्र कॅमेरा बसविण्याचे काम हाती घेईल. पूर्वी असे घडत होते, मात्र आता पुन्हा आम्हाला गंभीर व्हावे लागेल. आम्ही गोमंतकीय कुणाचेही खुल्या हाताने स्वागत करतो, सर्वांची घरे खुली असतात. ही गोव्याची राहण्याची स्टाईल आहे. ती आता मारक ठरत आहे. म्हापशात सर्वत्र कॅमेरा बसवण्याची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी दूरदृष्टीकोन ठेवणे गरजेच-दत्ता खोलकर
एवढा मोठा दरोडा पडणे म्हणजे म्हापशात काहीतरी कमी आहे असे वाटते. यावर कारवाई त्वरित होणे गरजेचे आहे. घरे वाढली तरी रात्रीची गस्त सुधारणे ही काळाची गरज आहे. येथे रात्री 12 वाजेपर्यंत डिलीवरी बॉयज येतात, सर्वत्र फिरतात. हे सर्व बाहेरील राज्यांतील आहेत. पोलिसांनी आता दूरदृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. आरोपींना त्वरित गजाआड करणे गरजेचे आहे, असे मत दत्ता खोलकर यांनी व्यक्त केले.
दरोडेखोरांना 100 टक्के पकडले जाईल- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, तपास योग्यमार्गी सुरु आहे. असे प्रकार घडू नये म्हणून नाकाबंदी आणखी वाढविणार असून रात्री पोलिस गस्त वाढवली जाईल. हे दरोडेखोर सराईत आहेत. ते उत्तर भारतीय हिंदी भाषेत बोलत होते, असे आढळून आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून दरोडेखोरांना 100 टक्के पकडले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.