For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हापशात दरोडा, 50 लाख लंपास

03:47 PM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
म्हापशात दरोडा  50 लाख लंपास
Advertisement

गणेशपुरीतील डॉ. घाणेकरांचा बंगला लक्ष्य : कुटुंबीयांचे हातपाय, तोंडे बांधून साधला डाव,मोबाईल, डीव्हीडी, कारसह पळाले दरोडेखोर, पोलिस पथक बेळगावच्या दिशेने रवाना

Advertisement

Robbery in Mhapsha, 50 lakh lumpasम्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे प्रसिद्ध डॉक्टर घाणेकर यांच्या बंगल्यात मंगळवारी पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान 7 बुरखाधाऱ्यांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोड्यात सुमारे 10 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने मिळून 50 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी पळविला आहे. त्याशिवाय बंगल्यातील सर्वांचे मोबाईल फोन तसेच कार घेऊन ते पळाले आहेत. बंगल्यातील कोणीही पोलिसांशी संपर्क साधू नये म्हणून त्या सर्वांचे मोबाईल फोन तसेच सीसी टीव्ही, डीव्हीडी कॅमेरा, इतकेच नव्हे तर डॉक्टरांच्या कारची चावी जबरदस्तीने घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. या दरोड्यामुळे म्हापसा शहरासह संपूर्ण गोव्यात खळबळ माजली आहे.

घटनेची माहिती मिळल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि घाणेकर कुटुंबीयांशी चर्चा करून अधिक माहिती जाणून घेतली. दरोडेखोरांना 100 टक्के पकडण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. म्हापशातील प्रसिद्ध डॉ. मोहन घाणेकर यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर बंगल्यात त्यांच्या पत्नी सुहासिनी घाणेकर (वय 80), पूत्र डॉ. महेंद्र घाणेकर, स्नुषा सौ. अनुराधा घाणेकर, नात उर्वी घाणेकर राहतात. गणेशपुरी म्हापसा येथे गणेश मंदिराच्या तिसऱ्या लेनमध्ये डॉ. घाणेकर यांचा हा बंगला आहे. मिरामार येथे तीन महिन्यापूर्वी धेंपे यांच्या बंगल्यावर घातलेल्या दरोड्यात आणि गणेशपुरी म्हापसा येथील या दरोड्यात थोडेफार साम्य आढळून येत आहे. मिरामार दरोड्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

Advertisement

असे घडले दोन तासांचे थरारनाट्या

  • पोलिसांच्यामाहितीनुसारसातजण बुरखाधारी दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान दरोडा घातला.
  • बंगल्याच्या खिडकीचे ग्रील कापून अगोदर एक दरोडेखोर आत घुसला. त्यानेच मुख्य दरवाजा उघडून इतर दरोडेखोरांना आत घेतले.
  • डॉ. महेंद्रघाणेकरव त्यांच्या पत्नी अनुराधा यांना दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दोघांचेही हातपाय चादर व साडीने बांधले. आवाज केल्यास जीवंत मारण्याची धमकी दिली.
  • दरोडेखोरएवढ्यावरचथांबले नाहीत. कुणीही आरडाओरडा करू नये म्हणून त्यांच्या तोंडात कापूस कोंबला.
  • डॉ. महेंद्रयांचीआई सुहासिनी स्वत:साठी चहा करीत होती. त्यांचे हात पाठीमागे बांधून त्यांना पहिल्या मजल्यावरील बाथरूममध्ये डांबून ठेवले.
  • सुहासिनीयांनीत्यांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण केली.
  • दरोडेखोरांनीफ्रिजमधीलसफरचंदे, संत्री खाल्ली. अनुराधा यांनी आपल्यासाठी केलेला चहाही त्यांनी पिऊन टाकला.
  • दरोडेखोरांनीडॉ. महेंद्रयांची कार घेऊन तेथून पळ काढला.
  • नंतरबंगल्यातीलसर्वांनी कसेबसे स्वत:ला सोडवून घेतले.
  • घटनेचीमाहितीशेजारी माजी नगरसेवक संजय मिशाळ यांना दिली.
  • संजयमिशाळयांनी घाणेकर कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली.
  • म्हापसापोलिसांनीतात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा सुरू केला. श्वानपथक, ठसेतज्ञ घटनास्थळी आले. थ्यानंतर तपास सुरु झाला.

दरोडेखोर बेळगाव मार्गे पळाल्याचा संशय

दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या कारची चावी त्यांच्याकडून जबरदस्तीने घेतली. त्याच डीए-03 पी-7187 क्रमांकाच्या कारमधून सातही दरोडेखोरांनी पळ काढला. ती कार मंगळवारी दुपारी पणजी येथे मांडवी पुलाखाली आढळून आली. तेथून दरोडेखोर भाड्याच्या टॅक्सीने बेळगावमार्गे गेल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. त्या दरोडेखोरांच्या शोधात पोलिस पथक बेळगावला गेले आहे. जाताना घाणेकर कुटुंबीयांचे हिसकावलेले फोन कुठेतरी फेकून दिल्याचे समजते. हे सर्व फोन स्वीच ऑफ असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. डॉ. घाणेकर कुटुंबीयांचे नातेवाईक फोंडा येथील डॉ. नूतन देव यांनी पत्रकारांना सांगितले की, पैसे गेले खरे पण दरोडेखोरांनी घरातील कुणालाही इजा केली नसल्याने देवाचे आभार मानले पाहिजे. अन्यथा या घटनेला वेगळेच वळण लागले असते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

दरोड्याची माहिती मिळाल्यावर पोलिस महासंचालक अलोक कुमार, पोलिस महानिरीक्षक वर्षा शर्मा, पोलिस उपअधीक्षक राहुल गुप्ता, अधीक्षक तुषार वेर्णेकर, पोलिस उपअधीक्षक क्राईम तुषार लोटलीकर, उपअधीक्षक विल्सन डिसोझा, पोलिस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर अधिक तपास करीत आहेत. महेंद्र घाणेकर यांनी याबाबत लेखी तक्रार म्हापसा पोलिसस्थानकात दिली आहे.

म्हापशात सर्वत्र कॅमेरा बसवणार

उपसभापती तथा म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा म्हणाले, सकाळी या दरोड्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण पाठपुरवठा करीत आहे. काही माहिती हाती लागली आहे. ही घटना त्यांच्या घरी घडली ही दु:खाची गोष्ट. सर्वत्र कॅमेरा बसविण्याचे काम हाती घेईल. पूर्वी असे घडत होते, मात्र आता पुन्हा आम्हाला गंभीर व्हावे लागेल. आम्ही गोमंतकीय कुणाचेही खुल्या हाताने स्वागत करतो, सर्वांची घरे खुली असतात. ही गोव्याची राहण्याची स्टाईल आहे. ती आता मारक ठरत आहे. म्हापशात सर्वत्र कॅमेरा बसवण्याची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी दूरदृष्टीकोन ठेवणे गरजेच-दत्ता खोलकर

एवढा मोठा दरोडा पडणे म्हणजे म्हापशात काहीतरी कमी आहे असे वाटते. यावर कारवाई त्वरित होणे गरजेचे आहे. घरे वाढली तरी रात्रीची गस्त सुधारणे ही काळाची गरज आहे. येथे रात्री 12 वाजेपर्यंत डिलीवरी बॉयज येतात, सर्वत्र फिरतात. हे सर्व बाहेरील राज्यांतील आहेत. पोलिसांनी आता दूरदृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. आरोपींना त्वरित गजाआड करणे गरजेचे आहे, असे मत दत्ता खोलकर यांनी व्यक्त केले.

दरोडेखोरांना 100 टक्के पकडले जाईल- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, तपास योग्यमार्गी सुरु आहे. असे प्रकार घडू नये म्हणून नाकाबंदी आणखी वाढविणार असून रात्री पोलिस गस्त वाढवली जाईल. हे दरोडेखोर सराईत आहेत. ते उत्तर भारतीय हिंदी भाषेत बोलत होते, असे आढळून आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून दरोडेखोरांना 100 टक्के पकडले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement
Tags :

.