कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोनापावला येथील धेंपो कुटुंबाच्या बंगल्यात दरोडा

12:35 PM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाखो रुपयांचा ऐवज लंपास : सुरक्षा रक्षकाला केली मारहाण ,बंगल्यातील वृध्दांना बांधले बेडला

Advertisement

पणजी : नागाळी-दोनापावला येथील धेंपो कुटुंबियांच्या बंगल्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या बंगल्यात राहत असलेल्या धेंपो कुटुंबातील वयोवृध्द जोडप्याला रविवारी रात्री अत्यंत भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. तीन सशस्त्र दरोडेखोर बंगल्यात घुसले आणि त्यांनी 77 वर्षीय जयप्रकाश धेंपो आणि त्यांची 71 वर्षीय पत्नी पद्मिनी यांना त्यांच्या पलंगावर बांधले. रात्री 12 ते पहाटे 4 च्या दरम्यान सुरक्षा रक्षकावर हल्ला करून तिघेही बंगल्यात घुसले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रथम पद्मिनी यांना बेडवर बांधले आणि नंतर जयप्रकाश यांना बांधले, अशी माहिती पोलिसांनी दिली. जयप्रकाश यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समोर तीन व्यक्ती उभ्या असल्याचे दिसल्याचे पोलिस म्हणाले. त्यामुळे हा दरोडा तिघांनी घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरोड्याची घटना घडली तेव्हा बंगल्यात फक्त ज्येष्ठ नागरिक होते. घटनेनंतर दरोडेखोर मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले. सकाळी घरकाम करणाऱ्या महिलेने दैनंदिन कामे करण्यासाठी घरात प्रवेश केला तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिने तातडीने वृद्ध जोडप्याला सोडले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Advertisement

पोलिसांना माहिती मिळताच पणजी पोलिस पथकासह निरीक्षक विजयकुमार चोडणकर पणजीचे उपविभागीय अधिकारी सुदेश नाईक, उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पहाणी केली.  दरोडेखोरांनी पळवून नेलेल्या वस्तूंची किंमत किती आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे उघड झाले आहे. पणजी पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्यासाठी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. त्यांनी अज्ञात व्यक्तींविऊद्ध एफआयआर नोंद केला आहे आणि संशयितांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. सुदैवाने सशस्त्र दरोडेखोरांनी वृद्ध जोडप्याला कोणतेही नुकसान केले नाही. सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी खाजगी ऊग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलासंनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. फिंगरप्रिंट्स तपासण्यात आले तेव्हा फॉरेन्सिक तज्ञांना महत्वाचे पुरावे मिळाले आहेत, असे अक्षत कौशल म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article