महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रेकी’ करुनच कोवाड एटीएमवर दरोडा

10:58 AM Jan 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / राजेंद्र होळकर : 

Advertisement

तब्बल 1 हजार 678 किलोमीटरचे अंतर पार करुन, तसेच रेकी करुन चंदगड तालुक्यातील कोवाड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर राजस्थानातील टोळीने दरोडा टाकला. एटीएम फोडूत त्यांनी 18 लाख 77 हजारांची रोकड पळवली. राजस्थानमधील पहाडी तालुक्यातील सामादिका गावातील दरोडेखोरांच्या टोळीतील सात जणापैकी चौघांच्या मुसक्या आवळण्यास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. अद्यापी टोळीचा मास्टर माईंड सलीम खानसह तिघे पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement

कोवाड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यापूर्वी राजस्थान मधील पहाडी तालुक्यातील सामादिकातील दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर माईंड सलीम खान याने जेसीबी ऑपरेटर म्हणून काही महिने येथे काम केले. या काळात सीमाभागासह चंदगड तालुक्याची इंस्तभूत माहिती घेत, त्याने कोवाड एटीएम सेंटरची रेकी केली होती. त्यानंतरच या टोळीने चारचाकी वाहनामधून येऊन या एटीएम सेंटरवर दरोडा टाकला, अशी कबुली या टोळीच्या अटकेतील चौघा संशयितांनी दिली. त्यामुळे कोवाड एटीएम सेंटरवर राजस्थानातील चोरट्यांची नजर कशी पडली, याचा उलगडा अटक केलेल्यांनी दिलेल्या माहितीद्वारे तपासातून समोर आला.

या टोळीतील चौघेंना अटक करण्यास पोलिसांना यश आले. पण या टोळीचा मास्टरमाईंड सलीम खान, साथीदार इस्माईल, अकबर हे अद्यापी पसार आहेत. या एटीएम मशीनमधील चोरलेली 18 लाख 77 हजारांची रक्कम या तिघाकडे ठेवण्यात आल्याची माहिती अटकेतील चौघांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे या तिघांचा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांकडून शोध घेतला जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

टोळीचा मास्टरमाईंड सलीम खान अद्यापी पसार आहे. त्याच्या मागावर पोलीस आहेत. त्याने या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यापूर्वी केलेल्या रेकीनंतर दरोडा टाकण्याबाबतची संपूर्ण माहिती पालघर जिह्यात वेल्डर म्हणून काम करत असलेल्या विश्वासू साथिदार अक्रम खान याला दिली. त्याने याबाबतची माहिती जवळचा मित्र तस्लीम खान याला दिली. त्यानेच आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असल्याचा बनाव कऊन, मित्राची चारचाकी मागून घेतली. तो चारचाकी घेऊन अक्रम राहत असलेल्या पालघर जिह्यातील गावी आला. तेथून या टोळीने चारचाकी गाडीची नंबर प्लेट बदलून 5 जानेवारीच्या मध्यरात्री कोवाड येथे एटीएमवर दरोडा टाकला, ही बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

एटीएमवरील दरोड्याची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा पाठलाग सुऊ केला. यावेळी चोरट्यांनी भरधाव चारचाकी गाडीतून पलायन केले. पोलिसांच्या पाठलाग दरम्यान चारचाकी चालक तस्लीम खानने पोलिसांच्या गाडीला धडक दिली अन् तो पुढे निघून गेला. त्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यावर चारचाकीचा टायर फुटल्याने, चोरट्यांनी चारचाकी गाडी रस्त्यात सोडून पलायन केले. यावेळी त्यांनी रस्त्यावर ट्रक अडवून, त्यामध्ये बसून पोलिसांना चकवा दिला. ट्रकमधील काही किलोमीटरचा प्रवास थांबवून, चोरट्यांनी ट्रॅव्हर्ल्समधून प्रवास कऊन, सामादिका (ता. पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान) येथे ते पोहचले. तेथून हे सर्व जण हरियाणा येथील इस्माईलकडे गेले. त्याच्याकडेच काही दिवस आश्रयाला ते थांबले. तेथून अटक केलेले चौघे पालघर येथे आले असता पोलिसांच्या जाळ्dयात अलगद सापडले.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article