महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना मिळाली नवीन नावे

06:24 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरकती नोंदविण्यास महिन्याभराचा कालावधी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

कॅम्प परिसरातील जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांची रस्त्यांना दिलेली नावे बदलण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत मांडण्यात आला होता. यामध्ये तब्बल 34 रस्त्यांची नावे बदलली जाणार आहेत. इतिहासातील वीर-पुरुष, देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांची नावे रस्त्यांना देण्यात आली आहेत. या संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डने हरकती मागविल्या असून पुढील महिन्याभराचा कालावधी देण्यात आला आहे.

वर्षानुवर्षे कॅम्पमधील रस्त्यांना जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे नाव देण्यात आले होते. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याऐवजी देशातील वीर-पुरुष व शहीद जवानांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी मांडला होता. या प्रस्तावावर 15 जुलै रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी रस्त्यांचे नाव बदलण्याला मंजुरी देण्यात आली.

नाव बदलण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती जाणून घेतल्या जाणार आहेत. यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ज्या नागरिकांना रस्त्यांचे नाव बदलण्यात हरकत असेल त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात जाऊन हरकत नोंदवावी लागेल. त्यानंतर निश्चित करण्यात आलेली नावे कायम केली जाणार आहेत.

पूर्वीचे नाव                                    आताचे नाव

हायस्ट्रीट                                       छत्रपती शिवाजी महाराज मार्ग

नोलन मार्ग                                       योगेंद्र यादव मार्ग

डिसिल्वा लेन                                 संजयकुमार रोड

सर्क्युलर रोड                                    बानासिंग रोड

सेंट अॅन्थोनी स्ट्रीट                          देवनसिंग मार्ग

स्मार्ट रोड                                     विक्रम बत्रा रोड

कॅटल रोड                                      नासिर अहमद वाणी रोड

मोची रोड                                      बाबू जगजीवनराम मार्ग

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article