शहरातील रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरु
पॅचवर्कच्या कामांनाही गती
कोल्हापूर :
शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची कामे पावसाच्या विश्रांतीनंतर युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहेत. याचसोबत मुदतीमधील रस्त्यांच्या पॅचवर्कची कामेही सुरु करण्यात आली आहेत. 100 कोटी अंतर्गतही रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील मुख्य रस्ते तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश सर्व उपशहर अभियंता यांना दिले होते. त्यानुसार पावसाने विश्रांती दिल्याने शहरामध्ये पॅचवर्कची कामे शुक्रवार पासून सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये श्री लॉन ते राधानगरी रोड, अंबाई टँक ते श्री कृष्णा मंदीर व नंगीवली चौक ते रेसकोर्स नाका, माळकर तिकटी ते मटण मार्केट रोड, रेड्याची टक्कर ते विश्वकर्मा अपार्टमेंट रोड, कमला कॉलेज पूर्व ते वास्कर बंगला, शाहूपूरी भास्कर प्लाझा चौक या परिसरात पॅचवर्क करण्यात आले. नगरोत्थान निधीमधून निर्माण चौक ते जरगनगर व नगीवली चौक ते संभाजीनगर रेसकोर्स हा रस्ता रुंदी, खडीचा बेस करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचसोबत सुभाषरोड ते भोसले हॉस्पीटल व लक्षतीर्थ वसाहत येथे स्ट्रॉमवॉटरचे काम सुरु असून, माऊली पुतळा ते गोखले कॉलेज येथील साईट गटर्स चे काम चालू आहे. झूम प्रकल्प येथील भोसलेवाडी ते जाधववाडी येथे पूर्ण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु आहे.
सदरची कामे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, महादेव फुलारी सुरेश पाटील यांनी करुन घेतली आहेत.