कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

11:14 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

Advertisement

खानापूर : शहरातील रस्त्यांची समस्या आता मिटणार आहे. शहरातील मुख्य रस्ता, तसेच स्टेशन रोड यासह शहरातील इतर रस्त्यांचा विकास होणार आहे. तसेच  शहरांतर्गत जाणारा तालगुप्पा राज्यमार्ग राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस रस्त्याचेही बांधकाम होणार आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा होणार असून यामुळे शहराचे सौंदर्य तसेच विकासात भर पडणार आहे, असे वक्तव्य आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनवेळी व्यक्त केले. यावेळी अभियंते तिरुपती राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून शहरातील राजा शिवछत्रपती स्मारक ते ज्ञानेश्वर मंदिर तसेच तहसीलदार कार्यालय ते सर्वोदय हायस्कूल या रस्त्याच्या विकासासाठी अनुदान मंजूर झाले आहे.

Advertisement

या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आमदार पुढे म्हणाले, कंत्राटदार प्रकाश पाटील यांनी शहरातील रस्त्याच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करू नये. रस्त्याच्या दर्जाबाबत काही चूक झाल्यास कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी नगराध्यक्ष मिनाक्षी बैलूरकर, मुख्याधिकारी संतोष कुरबेट, भाजपचे नेते सदानंद पाटील, अॅड. चेतन मणेरीकर, बसवराज सानीकोप, नगरसेवक अप्पया कोडोळी, लक्ष्मण मादार, मेघा कुंदरगी, मजहर खानापुरी, राजश्री तोपिनकट्टी, नारायण ओगले, संजय कुबल, मल्लाप्पा मारीहाळ, राजेंद्र रायका, राजू जांबोटी, प्रेमानंद नाईक यासह नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article