दसरा चौक परिसरात बेस शिवायच रस्ता
कोल्हापूर :
दसरा चौक ते स्वयंभू मंदिर येथील रस्ता गुरूवारी रात्री करण्यात आला आहे. परंतू या ठिकाणी बेस (डब्ल्यूएमएम) करण्यात आलेला नाही. एकीकडे प्रशासनाकडून ठेकेदारावर दर्जदार रस्ता केले जात नसल्यावरून नोटीस बजावली आहे. दुसरीकडे अशा प्रकारे रस्ते काम सुरूच आहे.
नगरोत्थान योजनेतून 100 कोटींचे सुरू असलेल्या रस्त्याची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी जागेवर जावून पाहणी केली असता डांबरचे प्रमाण कमी वापरल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी ठेकदारास नोटीस बजावली तर उपशहर अभियंता यांना दंड केला आहे. शुक्रवारी चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंतांनाही कामावर लक्ष दिले नसल्याने नोटीस बजावली आहे.
एकीकड 100 कोटीतील रस्त्यांच्या सुमार दर्जावरून अशा प्रकारे कारवाई होत असताना दसरा चौक ते स्वयंमभू मंदिर येथील रस्ता गुरूवारी रात्री घाईगडबडीत केला आहे. यामध्ये बेस न करताच थेट डांबरीकरण करण्यात आले. 100 कोटीतील रस्ता कसा करावा याचे करारात नमूद केले आहे. त्यानुसार हा रस्ता होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ठेकेदाराने रात्री 10 डंपर डांबर आणून हा रस्ता केला. यंत्रणा वापरली असली तरी बेस केला नसल्यावरून आता हा रस्ताही चर्चेचा विषय बनला आहे.
दसरा चौकातील सस्ता योग्य पद्धतीनेच
दसरा चौक ते स्वयंभू मंदिर येथील रस्त्यावर अगोदरच बेस तयार होता. यामुळे नव्याने बेस करण्याची गरज नव्हती. जर बेस पुन्हा केला असता तर रस्त्याची उंची वाढली असती.
नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका