Solapur : मंगळवेढ्यात ऊस वाहतुकीसाठी रस्ते सुरक्षा जनजागृती राबवली मोहीम
संत दामाजी कारखान्यात रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन
मंगळवेढा : राज्यात सर्वत्र साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले आहे. रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होत आहे. उसाने भरलेली वाहने रात्री-अपरात्री रत्यावरुन जाताना सुरक्षिततेचे नियमांचे पालन करण्यासाठी संत दामाजी कारखाना येथे रस्ते सुरक्षा अभियान घेण्यात आले. यावेळी मंगळवेढ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पिसे उपस्थित होते.
सपोनि पिसे म्हणाले, ट्रॅक्टर, बैलगाडी वाहनांच्या पाठीमागील बाजूस रिप्लेक्टर लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. वाहनांवर रिफ्लेक्टर बोर्ड लावावेत, वाहन चालविताना मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावू नये, ओव्हरलोड वाहतूक करु नये, ऊसाने भरलेली अवजड वाहने पुढे नेण्यासाठी स्पर्धा करु नये, रस्त्यावर वाहन नादुरुस्त झाल्यास पुढे व पाठीमागे रिफ्लेक्टीव्ह कोन लावून घ्यावेत अशा सूचना दिल्या.
यावेळी रस्ते वाहतुकीचे नियमही सर्व उपस्थित वाहन चालकांना समजावून सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे ऊस वाहतुकीस असणाऱ्या बाहनांना सपोनि पिसे, पोलीस हवालदार संभाजी यादव, कॉन्स्टेबल युबराज साळुंखे, सोनाली जुंधळे यांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावण्यात आले.
यावेळी चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन तानाजी खरात यांनी ऊस तोडणी बाहतुकीसाठी असणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, डंपिंग ट्रॅक्टरकरिता रिफ्लेक्टर तयार करुन संबंधित वाहन मालकांना दिले आहेत. त्याचबरोबर वाहन मालक, चालकांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी कारखान्याचे संचालक तानाजी कांबळे, मुडवीचे सरपंच सचिन खरात, वाहन ठेकेदार बंडू करे, तुकाराम लबटे आदी उपस्थित होते.