महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रस्त्याची नदी, गादीची नाव

06:23 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठा पाऊस झाला, की रस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागते आणि त्यांच्या अक्षरश: नद्या होतात, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. अशा पाणीमय मार्गांवरुन चालणे किंवा वाहन चालविणे अत्यंत जिकिरीचे असते. कारण पाण्याने भरलेल्या मार्गांवरील ख•s दिसत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना किंवा वाहनचालकांना जपूनच प्रवास करावा लागतो. कित्येकदा अशा मार्गांचा उपयोग टाळावा लागतो.

Advertisement

महाराष्ट्राच्या पुणे शहरात काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मार्गांवर पाणीच पाणी झाले. अनेक मार्गांवरुन ते नदीसारखे वेगाने वाहू लागले. येरवडा येथील एका युवकाने अशा मार्गावरुन प्रवास करण्यासाठी अनोखी युक्ती योजिली. त्याने पाण्यावर तरंगणारी गादी घरातून आणली आणि या गादीवर आरामात पडून त्याने पाण्याने भरलेल्या मार्गावरुन मार्गक्रमणा केली. त्याच्या एका मित्राने या दृष्याचे व्हिडीओ चित्रण करुन ते प्रसिद्ध केल्याने हा प्रसंग अनेकांना समजला. सध्या हे व्हिडीओ दृष्य चांगलेच प्रसिद्ध होत आहे. मार्ग पाण्याने भरलेला असल्याने त्यावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे गादीची नाव करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे या व्हिडीओ चित्रणातून आपल्याला दिसून येते.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article