Sangli : आटपाडीत रस्ते खडीकरण कामांचा शुभारंभ
आटपाडीतील पायाभूत विकासावर शिवसेनेचा भर
आटपाडी : आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील जनतेच्या दिर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत प्रश्नांची सोडवणूक करण्यावर शिवसेनेने भर दिला आहे. भक्कम पायाभूत विकास आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात शिवसेना सातत्याने आघाडीवर राहिली असून येणाऱ्या कालावधीतही विकासासाठी शिवसेनाच आघाडीवर राहिल, असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.
आटपाडीत रोहित जगताप घर ते धांडोरओढा या मार्गावरील रस्त्याच्या मुरमीकरण व खडीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दत्तात्रय पाटील, सभापती संतोष पु-जारी, पृथ्वीराज पाटील, शहाजी जाधव, दिनकर पाटील, अमरसिंह पाटील, आप्पासो पाटील, डॉ. श्रीनाथ पाटील, आप्पासो माळी, रावसाहेब सागर, पोपट पाटील, उत्तम बालटे, राजेश नांगरे, रामभाऊ सूर्यवंशी, अमोल लांडगे, सुहास नवले प्रमुख उपस्थित होते.
या कामांमुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा लाभ होणार आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत होतील, असा विश्वास तानाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी नंदकुमार लोहार, कल्याण काळे, प्रकाश बनसोडे, वैभव बोराडे, रोहित जगताप, प्रशांत चोरमले, अक्षय जगताप, संदीप सरगर, कुमार आंथरोळकर, गुलाब चव्हाण, विनायक देशमुख, उमेश देशमुख, प्रभाकर देशमुख, शंकर देशमुख, ओंकार गायकवाड, विकास पाटील उपस्थित होते.