साबांखाचे रस्ता अभियंते, कंत्राटदारांचे धाबे दणाणले
खराब रस्त्यावऊन कारणे दाखवा नोटीस दिल्याने खळबळ : नोव्हेंबरमध्ये रस्त्यांची दुरुस्ती होणार
पणजी : खराब रस्त्यावऊन कारणे दाखवा नोटीस दिलेल्या एकूण 30 अभियंत्यांना उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रस्त्यांची दुर्दशा पाहून एकंदरित गंभीर दखल घेऊन इशारा दिल्यामुळे अभियंते तसेच कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. रस्ता कामासाठी नेमलेल्या अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदारांना रस्ता दुरुस्तीची सूचना केली असून पाऊस थांबल्यानंतर लगेच रस्त्यांची कामे हाती घेण्यास सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून डिसेंबरमध्ये रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण होणार असल्याची माहिती देण्यात आली.
रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याकडे अजून दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्या काळात वीज खाते, पाणी विभाग व इतर दूरसंचार कंपन्या यांनी रस्त्यातील कामे करुन घ्यावीत असे बांधकाम खात्याने सूचित केले आहे. दोन महिन्यानंतर कोणालाच रस्ते फोडण्यासाठी परवाने मिळणार नाहीत, असे खात्यातील सूत्रांनी सांगितले आहे. अभियंत्यांची दक्षता खात्यामार्फत चौकशी कऊन दोषी असणाऱ्यांची वेतनवाढ रोखून ठेवण्यात येणार आहे. अभियंते दोषी असतील तर संबंधित कंत्राटदार आणि कंत्राटदार दोषी ठरल्यास संबंधित अभियंते कारवाईतून सुटणार नाहीत असा इशाराही नोटीसीतून देण्यात आला आहे. त्या इशाऱ्यामुळे कंत्राटदार, अभियंते घाबरले असल्याचे समोर आले आहे.