For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालू आर्थिक वर्षात रस्ते बांधणी 5-8 टक्क्यांनी वाढणार

06:56 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
चालू आर्थिक वर्षात रस्ते बांधणी 5 8 टक्क्यांनी वाढणार
Advertisement

12,500-13,000 किलोमीटर बांधणी होणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील रस्ते बांधकाम पाच ते आठ टक्क्यांनी वाढून 12,500-13,000 किलोमीटरवर जाण्याची शक्यता आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 20 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवण्यात आली.

Advertisement

रेटिंग एजन्सी इक्राने सांगितले की चालू आर्थिक वर्षात आगामी प्रकल्प, सरकारकडून भांडवली खर्चात वाढ आणि प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

इक्राने जोर दिला की काही भौगोलिक भागात लांबलेल्या पावसामुळे आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत रस्ते बांधणीवर परिणाम झाला.

अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम हा या प्रक्रियेचा मुख्य आधार असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्याचे योगदान 70-75 टक्के होते. यानंतर, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर (बीओटी)  हायब्रिड न्युइटी मोड (एचएएम) चा वाटा 25-30 टक्के होता.

Advertisement
Tags :

.