For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरएलडी-सपा युतीवर शिक्कामोर्तब

06:23 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरएलडी सपा युतीवर शिक्कामोर्तब
Advertisement

7 ते 8 जागा संयुक्तपणे लढणार : अखिलेश यादव-जयंत चौधरी यांच्यात चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यात एक करार झाला आहे. समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोकदलासाठी लोकसभेच्या 7 जागा सोडल्या आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल दुबे यांनी या कराराला दुजोरा देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या बैठकीनंतर हा करार झाल्याचे स्पष्ट केले. सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटप अद्याप झालेले नाही.

Advertisement

उत्तर प्रदेशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यात जागांबाबत करार झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडी 7 ते 8 जागांवर आघाडी करून लढणार आहे. त्यानुसार पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर आरएलडीसोबत करार झाला आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सपाने आरएलडीसाठी कोणत्या जागा सोडल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  सपा नेते अखिलेश यादव आणि आरएलडी नेते जयंत चौधरी यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर ‘राष्ट्रीय लोकदल आणि सपा यांच्या युतीबद्दल सर्वांचे अभिनंदन! विजयासाठी आपण सर्व एकत्र येऊया!’ अशी पोस्ट केली आहे. आरएलडीसोबतच्या जागांबाबत बोलणी पूर्ण झाली असली तरी सपाने अद्याप काँग्रेससोबतच्या जागा निश्चित केलेल्या नाहीत.

Advertisement
Tags :

.