रिझवान, बाबरला संघातून डच्चू
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
न्यूझीलंडमध्ये पाक आणि यजमान न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार असून पीसीबीने घोषित केलेल्या पाक संघातून कर्णधार मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना वगळले आहे. या मालिकेसाठी सलमान अली आगाकडे कर्णधारपद सोपविण्यात आले असून अष्टपैलु शदाब खान उपकर्णधार म्हणून राहिल.
दरम्यान पाकच्या वनडे संघाचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे कायम ठेवण्यात आले असून सलमान अली आगा उपकर्णधार म्हणून राहिल. न्यूझीलंडमध्ये पाकचा संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. सईम आयुब अद्याप तंदुरुस्त नसल्याने तो या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही.
पाक टी-20 संघ: सलमान अली आगा (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), शफीक, अब्रार अहम्मद, हॅरीस रौफ, हासन नवाज, जहाँदाद खाँ, खुशदिल शहा, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद इरफान खान, ओमर बिन युसुफ, शाहीफ आफ्रिदी, सुफियान मुक्कीम, उस्मान खान
पाक वनडे संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आग (उपकर्णधार), शफीक अब्रार अहम्मद, अखिफ जावेद, बाबर आझम, फईम आशरफ, इमाम उल हक, खुशदिल शहा, मोहम्मद अली, मोहम्मद वासीम ज्युनियर, मोहम्मद इरफान खान, नसीम शहा, सुफीयान मुक्कीम आणि तयाब ताहीर