For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पिल’द्वारे ओटीटीवर पदार्पण करणार रितेश

06:08 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पिल’द्वारे ओटीटीवर पदार्पण करणार रितेश
Advertisement

सीरिज होणार 12 जुलैला प्रदर्शित

Advertisement

रितेश देशमुख आता वेबसीरिजच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. त्याची पहिली वेबसीरिज ‘पिल’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राजकुमार गुप्ता या आगामी सीरिजचे दिग्दर्शन आहेत. अभिनेत्याने जियो सिनेमासोबत वेबसीरिजची अधिकृत घोषणा केली. सीरिजच्या पोस्टरसोबत याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

ही सीरिज देशातील औषध उद्योगावर आधारित आहे. ही सीरिज 12 जुलै रोजी जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. तर मोशन पिक्चरमध्ये रितेश हा एका प्रयोगशाळेत हातात एक गोळी घेऊन असल्याचे दिसून येते. ‘तुमच औषध प्रत्यक्षात कशाद्वारे तयार करण्यात आले आहे’ असा प्रश्न पोस्टरवर उपस्थित करण्यात आला आहे.

Advertisement

औषधनिर्मिती क्षेत्रातील गैरप्रकार उघड करणाऱ्या एका व्हिसलब्लोअरचा संघर्ष या सीरिजमध्ये दाखविण्यात आला आहे. सीरिज नैतिकता आणि भ्रष्टाचाराची एक आकर्ष कहाणी सादर करते. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मूव्हीजकडून निर्मित आणि राजकुमार गुप्ता यांच्याकडून दिग्दर्शित ‘पिल’ सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

रितेश यापूर्वी वेड या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पिल सोबत रितेश काकुडा या ओटीटी चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट झी5 वर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा तसेच साकिब सलीम दिसून येतील.

Advertisement
Tags :

.