For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमान दुर्घटनेच्या 4 आठवड्यांपूर्वी ब्रिटनचा इशारा

06:30 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
विमान दुर्घटनेच्या 4 आठवड्यांपूर्वी ब्रिटनचा इशारा
Advertisement

बोइंग विमानांच्या फ्यूल कंट्रोल स्विचच्या बिघाडाबद्दल होता अलर्ट : दुरुस्त करा किंवा बदला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण केल्यावर एआय-171 बोइंग 787-8 विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेच्या 4 आठवड्यांपूर्वी ब्रिटनच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने (सीएए) बोइंगच्या अनेक विमानांमध्ये फ्यूल कंट्रोल स्विचच्या बिघाडावरून इशारा जारी केला होता. सीएएने या स्विचची प्रतिदिन तपासणी करण्याचा आदेश दिला होता. एअर इंडिया किंवा डीजीसीएपर्यंत ही माहिती वेळीच पोहोचली असती तर बहुधा 241 विमान प्रवाशांसमवेत 270 जणांचा जीव वाचू शकला असता.

Advertisement

ब्रिटनच्या सीएएने 15 मे रोजीच एक सुरक्षा नोटीस जारी केली होती. यात अमेरिकन कंपनी बोइंगच्या 787 ड्रीमलायनर समवेत 5 मॉडेल्सच्या ऑपरेटसंना अमेरिकन एव्हिएशन अथॉरिटीच्या (एफएए) एअरवर्दीनेस डायरेक्टिवनुसार याची समीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. एफएएचा एअरवर्दीनेस डायरेक्टिव कायदेशीर स्वरुपात लागू होणारा एक नियम आहे. एफएएच्या निर्देशात इंधन बंद करणाऱ्या वॉल्व एक्ट्यूएटर्सला संभाव्य ‘सुरक्षा चिंते’च्या स्वरुपात अधोरेखित करण्यात आले होते. बोइंगच्या बी737, बी757, बी767, बी777, बी787 मध्ये लावण्यात आलेल्या इंधन बंद करणाऱ्या वॉल्वना प्रभावित करणाऱ्या संभाव्य असुरक्षित स्थितीला एफएएचा एअरवर्दीनेस डायरेक्टिव संबोधित करत असल्याचे सीएएच्या नोटीसमध्ये नमूद होते.

दैनंदिन तपासणीचा निर्देश

फ्यूल कंट्रोल स्विच एक महत्त्वपूर्ण उपकरण असून ते इंधनाची गळती रोखणे आणि विमानाच्या सुरक्षित संचालनासाठी इंधनप्रवाह सुनिश्चित करण्यास मदत करतो. ब्रिटनच्या नियामकाने एअरलाइन ऑपरेटर्सना बोइंग 787 समवेत अन्य विमानांवर इंधन पुरवठा बंद करणारे वॉल्व एक्ट्यूएटर्सचे परीक्षण, निरीक्षण किंवा बदलण्याचा निर्देश दिला होता. सुरक्षा नोटीसमध्ये विशेष स्वरुपात एअरवर्दीनेस डायरेक्टिवने प्रभावित विमानांमध्ये इंधन बंद करणाऱ्या वॉल्वची प्र्रतिदिन तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला होता.

फ्यूल कंट्रोल स्विच बंद झाल्याचा उल्लेख

भारताच्या विमान दुर्घटना तपास ब्युरोने (एएआयबी) एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेसंबंधीच्या स्वत:च्या प्रारंभिक अहवालात फ्यूल कंट्रोल स्विचचा उल्लेख केला आहे. तर एफएएफने 11 जुलै रोजी जारी एका नोटीसमध्ये फ्यूल कंट्रोल स्विच डिझाइनमुळे कुठलीही सुरक्षा जोखीम नसल्याचा दावा केला आहे. तर विमान कंपनी बोइंगने देखील जागतिक एअरलाइन्सना केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचाच पुनरुच्चार केला आहे.

Advertisement
Tags :

.