कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उन्हाच्या चटक्याने वाढतोय मधमाशांचा ‘डंख’

12:09 PM Mar 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी : 

Advertisement

वाढत्या तापमानामुळे उन्हाळा असह्य होत असताना प्राण्यांवरही उन्हाच्या तडाख्याचा परिणाम होत आहे. डोंगर, जंगलातील वणवा, शेतात लागलेल्या आगीचे धुर, कोणीतरी पोळ्याला दगड मारून केलेला खोडसाळपणा आदी कारणामुळे मधमाशा चवताळतात. यासह उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे मधमाशा चवताळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ञांनी सांगितले.

Advertisement

गतवर्षी मधमाशांच्या हल्ल्यात शाहूवाडी तालूक्यातील 65 वर्षीय वृद्धेला मृत्यू झाला. सदर वृद्धेला पळता न आल्याने व बचावासाठी कोणीच नसल्याने मधमाशांनी गंभीर हल्ला केला. त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर चार वृद्धांना गंभीर स्थितीतून बाहेर काढण्यात सीपीआरमधील डॉक्टरांना यश आले. मधमाशांचे 400 डंख झालेल्या वृद्धावर उपचार करून सीपीआरमधील डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील विविध भागाता मधमाशांनी घातक हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत.गत दोन महिन्यात चवताळलेल्या मधमाशांचा डंखामुळे शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. मधमाशांचे पोळे असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

तज्ञांच्या मते मधमाश्यांचे मिक्रॅपिस, मेगापिस, एपिस मॅलिफेरा व आफ्रिकन मधमाशी असे चार प्रकार आहेत. मिक्रॅपिस या उपप्रजातीमध्ये एपिस फ्लोरिया आणि अँड्रेनिफॉर्मिस या मधमाशांचा समावेश होतो. फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर अँड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे. एपिस या प्रजातीमध्ये 7 जातीच्या मधमाशा असून एकूण 44 उपजाती असल्याचे तज्ञांनी सांगितले.

मधमाशांनी अतिप्रमाणात चावल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. किडणीला इजा होण्याची शक्यता असते. काही लोकांमध्ये अॅनाफिलेक्सिस होतो. हा त्रास साधारणपणे चावल्यानंतर 15 मिनिटे ते एक तासाच्या दरम्यान होतो. पुरळ उठणे, खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जीभ सुजणे, गिळण्यास त्रास होणे, छातीत घट्टपणा येणे अशी या आजाराची लक्षणे असल्याचे तज्ञांनी सांगितले.

उंच झाडावर, कड्यावर, उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी मेगापिस जातीची मधमाशी अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध काढण्याचा प्रयत्न करताना त्या उत्तेजित झाल्यानंतर केलेल्या हल्ल्याने माणूस मधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते.

चवताळलेली मधमाशांचा डंक अधिक तीव्र असतो. मधमाशी तीव्रतेने चावल्यानंतर त्वचेवर काटेरी डंक मारते. या डंकातून विष सोडले जाते. विषात प्रथिने असतात. ज्यामुळे डंकाच्या जागेभोवती वेदना आणि सूज येते. याचा परिणाम शरीरातील रक्तवाहिन्यावर होतो.

साधारणत: मधमाशा स्वसंरक्षणार्थ डंक मारतात. यामुळे एक किंवा कदाचित काही डंख मारले जातात. मात्र, झुंडीने केलेल्या मधमाशांच्या हल्ल्याने गंभीर स्थिती उद्भवू शकते.

- डंख मारलेल्या जागी साबणाने आणि पाण्याने धुवा.

- डंखलेल्या जागी रिंग असल्यास ती काढून टाका.

- बर्फ व थंड पाण्याने शेका.

- ऍलर्जीची लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडुन उपचार घ्या.

- जंगलात किंवा मधमाशीच्या पोळ्याजवळ जाताना सावध रहा.

- मधमाशी तुमच्या डोक्यावर घोंगाऊ लागल्यास, शांतपणे तेथून दूर जा

- पळण्याचा प्रयत्न करू नका.

- मधमाशीवर वस्तू किंवा दगड फेकू नका.

- मधमाशी हल्ला करत असल्यास, हाताने चेहरा झाका.

- मानवी वस्तीत मधमाशांचे पोळे आढळल्यास अग्निशमनदलाशी संपर्क साधा.

उन्हाळ्यात मधमाशांच्या हल्ल्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. सीपीआरमध्ये जानेवारी महिन्यात एका वृद्धाला चवताळलेल्या मधमाशांनी 400 डंक मारले होते. शरीरातील सर्वच भागात मधमाशांचे डंक होते. दोन्ही किडण्याही निकामी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पंधरा दिवस औषधोपचार करून बरे करण्यात आले.

                        डॉ. बुद्धीराज पाटील, औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, सीपीआर

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article