महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है’

05:17 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुतण्याविरोधी लढ्याबद्दल भूपेश बघेल यांचे वक्तव्य

Advertisement

छत्तीसगडच्या पाटन मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात भाजपने त्यांचे पुतणे विजय बघेल यांना तिकीट दिले आहे. याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता भूपेश बघेल यांनी एका ओळीत उत्तर दिले असून ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. पुतण्याच्या विरोधात होत असलेल्या राजकीय सामन्याबद्दल बोलताना भूपेश यांनी ‘रिश्तें मे हम बाप लगते हैं’ असे म्हटले आहे.

Advertisement

विजय बघेल हे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील डायलॉगचा वापर करत भूपेश बघेल यांनी स्वत:च्या खासदार पुतण्याविरोधात आपण वरचढ ठरणार असल्याचा दावा केला आहे. विजय बघेल हे दुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. अशा स्थितीत काका-पुतण्यामधील लढाई रंगतदार होणार आहे. यापूर्वी 2008 आणि 2013 मध्ये दोघांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. 2008 मध्ये विजय बघेल यांनी विजय मिळविला होता. तर 2013 मध्ये काका भूपेश बघेल हे विजयी झाले होते. विजय बघेल यांना उमेदवारी देत भाजपने मुख्यमंत्री भूपेश यांना मतदारसंघातच अडकवून ठेवू पाहत आहे. भूपेश बघेल हे यापूर्वी महादेव अॅपमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat#NATIONAL#social media
Next Article